प्रेयसीला नकार दिल्याने त्याने नेत्यांना दिल्या खंडणीसाठी धमक्या
आमदार महेश लांडगे, वसंत मोरे, अविनाश बागवेंना खंडणीसाठी धमकी, बघा प्रकरण काय?
पुणे दि ७(प्रतिनिधी)- पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांना धमकी देण्याचा प्रकार समोर आला होता. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे आरोपीच्या शोधात पुणे पोलीसांची चांगलीच दमछाक झाली होती. अखेर आरोपीला खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे.
इम्राल शेख या आरोपीला खंडणी विरोधी पथकाने कोंढव्यातून अटक केली आहे. आरोपीने मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांचा मुलगा, पुण्याचे माजी महापाैर मुरलीधर मोहोळ त्यानंतर काँग्रेसचे माजी नगरसेवक अविनाश बागवे, आमदार महेश लांडगे यांच्या कार्यालयातील मोबाईलवरही ३० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करणारा मेसेज आला होता. आरोपी प्रत्येक नेत्याकडे एकाच मुलीचे नाव सांगून तीस लाखाची खंडणी मागायचा आणि पैसे खराडी येथे एका इमारतीच्या पार्किंगमध्ये एका इनोव्हा गाडीत पैसे ठेवायला हा आरोपी सांगायचा. या दुव्यावरुन पोलीसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलीसांनी खबऱ्यांच्या आधारे सायबर टीमची मदत घेत इम्रान शेखला ट्रॅप केले. त्याला आता पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्याच्या चौकशी आणि तपासातून अन्य कोणते धागेदोरे बाहेर येतात का??, हे पोलीस पाहणार आहेत. अलीकडे नेत्यांना धमकी देण्याचे प्रकार सातत्याने वाढत आहेत. दरम्यान इम्रान शेखला बेडा ठोकल्यानंतर पोलीस आज त्याला कोर्टात हजर करून त्याची चौकशी आणि तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी करणार आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी इम्रानला एका मुलीसोबत लग्न करायचं होतं. मात्र मुलीने लग्नाला नकार दिला. त्याचा राग मानात धरून त्याने तिची बदनामी करण्याच्या हेतूने संबंधित मुलीच्या नावाने राजकीय नेत्यांना धमकी द्यायचा आणि त्या मुलीच्या गाडीचा नंबर सांगून त्यात रक्कम ठेवण्यासाठी सांगायचा सध्या पुणे पोलीस या धमकी प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.