Latest Marathi News
Ganesh J GIF

‘५० खोके घेऊन चोर आले’ रॅप बनवणाऱ्या राम मुंगसेला अटक

रॅप साँगमधला 'तो' शब्द राज्य सरकारच्या जिव्हारी, अटकेवरुन आरोप प्रत्यारोप

मुंबई दि ७(प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांना सोबत घेत बंड केले. या या सत्तांतरानंतर एकनाथ शिंदे गटातील आमदारांना ५० खोके घेतल्याचा आरोप करण्यात आला, पण आता या सत्तानाट्यावर रॅपर राज मुंगासेने एक गीत तयार केले होते. पण त्यामुळे या तरूणाला आता अटक करण्यात आली आहे.

राम मुंगासेने ‘५० खोके घेऊन चोर आले, चोर आले पाहा ओके होऊन’, अशा शब्दात या युवकाने हे रॅप साँग तयार केलं होतं. या प्रकरणी छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी मुंगासे या युवकाला अटक केली आहे. शिंदे गटाच्या युवासेनेच्या एका सदस्याने या रॅप साँगबाबत आक्षेप घेत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर मुंगासेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे रॅप साँग तयार करणारा युवक मूळचा छत्रपती संभाजीनगरचा असल्याचे सांगण्यात येत आहे. राज मुंगासे याच्या व्हिडिओमध्ये भाजप आणि शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेबद्दल अपशब्द आणि आक्षेपार्ह टिप्पणी होती, असा आरोपात तक्रारीत करण्यात आला आहे. दरम्यान राम मुंगासे याला अटक केल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील या अटकेचा निषेध केला आहे. काही दिवसापूर्वी देखील आव्हाड यांनी या तरुणाला अटक करु नका असे ट्विट केले होते.

शिवसेनेत झालेल्या बंडाळीत ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केली. आमदार सर्वप्रथम गुजरातमधील सुरत, त्यानंतर आसाममधील गुवाहाटी आणि मग गोवा असा प्रवास करत महाराष्ट्रात आले. त्यावर राम मुंगासेचे रॅप साँग तयार करण्यात आले आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!