Latest Marathi News
Ganesh J GIF

पुण्यात कोयता गँगनंतर मुलींच्या गुलाबी गँगची दहशत

मुलींच्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल, पुण्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा

पुणे दि २५(प्रतिनिधी)- पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पण चिंतेचा विषय म्हणजे मुलीसुद्धा यात मागे नाहीत. मुलीसुद्धा रस्त्यावर हाणामारी करत असुन त्यांना गुलाबी टोळी नाव देण्यात आले आहे. आता शहरात महाविद्यालयीन मुलींच्या गुलाबी टोळीची दहशत पाहायला मिळत आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये काही दिवसांपूर्वी मुलींच्या या टोळक्याने एका मुलीला बेदम मारहाण केली होती. आता अशाच प्रकारे मारहाणीचा व्हिडिओ समोर आला आहे. आपआपसातल्या झालेल्या किरकोळ वादातून पिंपरी-चिंचवडमधील एका महाविद्यालयीन मुली बेभान होत एकमेकींना शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी तुडवत आहेत. या मुली काॅलेजमधील इतर मुलींना मारहाण करत आहेत. काॅलेजच्या गेटसमोरच असे प्रकार घडत आहेत.व्हायरल व्हिडिओत तरुणींचे एक टोळके मुलींना मारहाण करत होते. काही नागरिकांनी मध्यस्थी करत हा वाद शांत केला. पण मुलींच्या या टोळक्याने परत त्या मुलींना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे. आता या महाविद्यालयातील मुलींच्या गुलाबी गँगची दहशत मोडून काढण्यासाठी महाविद्यालय आणि पोलिस प्रशासन काय पावले उचलणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

पुण्यात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. कोयता गँगची दहशत शहरात असतानाच खुलरेआम गोळीबार झाल्याच्या घटना पुणे आणि परिसरात घडल्या आहेत. आता तर मुलींच्या टोळक्याचीही दहशत वाढली आहे. पुण्यातील गुन्हेगारीचा मुद्दा विधानसभेत देखील उपस्थित झाला होता. पण पुण्यातील गुन्हेगारी मात्र राजेरोस सुरूच आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!