Just another WordPress site

शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांची पुन्हा एकदा दादागिरी

प्राचार्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल, बांगरांनी एकनाथ शिंदेचा आदेश मोडला

हिंगोली दि २५(प्रतिनिधी)- हिंगोलीचे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर नेहमीच आपल्या आक्रमक भूमिकेमुळे अडचणीत आले आहेत. आता आमदार संतोष बांगर यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. त्यांनी एका पॉलिटेक्निक कॉलेजच्या प्राचार्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.यावरून संतोष बांगर यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे.

हिंगोली शहराजवळ असलेल्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्राचार्य अशोक उपाध्याय यांना आमदार संतोष बांगर यांनी शिवीगाळ करत मारहाण केली आहे. बांगर यांचे कार्यकर्ते सुद्धा प्राचार्यांचे कान पकडत मारहाण करत आहेत. हिंगोलीतील प्राचार्याला मारहाण केल्याचा व्हीडिओ हा दोन ते तीन दिवसांपूर्वीचा असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच सध्या हा व्हीडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणत व्हायरल होत आहे. तसेच यावर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान प्राचार्याने एका महिलेवरती अन्याय केला होता. त्यामुळे त्यांना जाब विचारला. त्या माहिलेवर अन्ययाच्या व्हिडिओची क्लीप माझ्याकडे आहे. आम्ही छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात राहतो. महिलेवरील अन्याय संतोष बांगर सहन करणार नाही.अशी प्रतिक्रिया बांगर यांनी दिली आहे.

GIF Advt

आमदार संतोष बांगर हे कोणत्या ना कोणत्या कारणांवरुन किंवा वादग्रस्त विधानावरुन सतत चर्चेत असतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगून सुद्धा बांगर कायदा हातात घेत असल्यामुळे शिंदे गट अडचणीत आलेला आहे.दरम्यान संतोष बांगर यांच्यावर मोक्का लावून अटक करावी अशी मागणी खरात यांनी केली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!