सुप्रिया सुळेंना सुनेत्रा पवार नव्हे तर हा उमेदवार देणार आव्हान?
अजित पवार गटाचा सुप्रिया सुळेंच्या विरोधातील उमेदवार ठरला? या कारणामुळे सुनेत्रा पवार यांचा पत्ता कट?
बारामती दि २(प्रतिनिधी)- अजित पवारांनी नुकतेच बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार देण्याची घोषणा करत शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याविरोधात उमेदवारी देण्याचे जाहिर केले आहे. त्यामुळे बारामतीत पवार विरूद्ध पवार असा सामना पहायला मिळणार मिळणार आहे. सुरूवातीला सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उमेदवार असणार असा अंदाज सांगितला जात होता. पण सुनेत्रा पवार यांच्याविरोधात आयात उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी पक्षासाठी बारामती हा त्यांचा बालेकिल्ला आहे. या बालेकिल्लांमध्ये शरद पवारांबरोबर अजित पवार गटाचे देखील तितकेच समर्थक आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात सलग १५ वर्ष सुप्रिया सुळे या खासदार आहेत. सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिल्यास त्यांना बारामतीमधून पाठिंबा मिळू शकतो. पण इंदापुर, पुरंदर आणि भोरमधून सुनेत्रा पवार यांना पाठिंबा मिळण्याची शक्यता कमी आहे. त्याचबरोबर दोन्ही पवारांशी सलोखा राखण्यासाठी लोकसभेला सुप्रिया सुळे आणि विधानसभेला अजित पवार यांना साध देण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर दुसरीकडे बारामतीबाबत भाजपने विशेष लक्ष दिले असून त्यामुळे भाजपा कोणतीही रिस्क घेऊ इच्छित नाही. त्यामुळे सुळेंच्या विरोधात पुन्हा एकदा भाजपमधील कांचन कुल यांच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो. कांचन कुल यांना उमेदवारी दिल्यास भाजपा त्यांना पुरेपूर साथ देण्याचा अंदाज आहे. कारण दौंड, इंदापुर, आणि खडकवासलामध्ये भाजपची ताकद आहे. याचसोबत अजित पवार गटाची देखील ताकद कांचन कुल यांना मिळेल. असा अंदाज आहे. त्यामुळे कांचन कुल यांनाच अजित पवार गटाची उमेदवारी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सुनेत्रा पवार बारामतीतून उभ्या राहिल्यास नणंद भावजय समोरासमोर येतील. त्यामुळे नाते संबंधात दुरावा येण्याची शक्यता. हे सर्व टाळण्यासाठी अजित पवार यांनी कांचन कुल यांचा पर्याय योग्य ठरवला जाण्याची शक्यता आहे. कांचन कुल यांनी २०१९ साली सुप्रिया सुळे यांना आव्हान दिले होते. त्यामुळे आता पुन्हा एकदा सुळे विरूद्ध कुल लढतीची शक्यता आहे.