अजित पवारांची साथ मिळताच भाजपाचा शिंदेना धक्का?
अजित पवार सत्तेत सामील होताच शिंदे गटाच्या खात्यांना कात्री, महत्वाची ही खाती अजित पवारांच्या गटाला
मुंबई दि ३(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रविवारी फूट पडून नऊ जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार हे उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. पण भाजपाने आता शिंदे गटापेक्षा अजित पवारांच्या गटाला महत्व देण्याचा निर्णय घेतला आहे. आता शिंदे गटातील महत्वाची खाती अजित पवारांना देत भाजपा शिंदे गटाचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे शिंदे अस्वस्थ आहेत.
अजित पवार यांच्या गटाला युती सरकारमध्ये १२ मंत्री पदे देण्यात येणार आहेत. जवळपास सर्व खाती महत्वाची असणार आहेत. कारण लोकसभा निवडणूकीत शिंदे यांच्यापेक्षा पवार यांची जास्त मदत भाजपाला होणार आहे. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तर आणखी तीन जणांना मंत्री पदाची शपथ घेणार आहेत. तसेच दोन दिवसात शपथ घेतलेल्या मंत्र्यांना खातेवाटप जाहीर होणार आहे. शिंदे फडणवीस सरकारमध्ये अजित पवार यांची एन्ट्री झाल्याने शिंदे गटाला देण्यात येणारी मंत्रीपदे कमी करण्यात आलेली आहेत.अगोदर भाजप आणि शिंदे गटात समसमान मंत्रिपदे दिली जाणार होती. पण आता भाजपला १७ शिवसेना शिंदे गटाला १४ आणि अजित पवार यांच्या गटाला बारा मंत्रिपदे देण्यात येणार आहेत. महत्त्वाची खाती अजित पवार गटाच्या वाट्याला आली आहेत. त्यामुळे शिंदे गटाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदे गटात अस्वस्थतेचे वातावरण आहे. पण आता पवारांची साथ मिळाल्याने शिंदे गटाचे महत्व कमी झाले आहे.
अजित पवार यांच्या गटाला कोणती खाती मिळणार याची एक संभाव्य यादी समोर आली आहे. त्यामुळे भाजपाला आता शिंदेपेक्षा अजित पवार जवळचे झाले असल्याची चर्चा रंगली आहे.
अजित पवार गटाला मिळणारी मंत्रीपदे
अर्थ किंवा महसूल
जलसंपदा
महिला आणि बाल विकास
क्रीडा आणि युवक कल्याण
अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालय
मासेमारी, वस्त्र मंत्रालय
मागास आणि बहुजन कल्याण
वाहतूक
गृहनिर्माण
अल्पसंख्याक आणि वक्फ
सामाजिक न्याय आणि आपत्ती व्यवस्थापन
पशुसंवर्धन