
एकनाथ शिंदे सोडून सगळे आमदार शिवसेनेत परत येतील पण…
खासदार संजय राऊत यांचे मोठे विधान, महापालिका निवडणूकबाबत 'ही' भुमिका
मुंबई दि १७(प्रतिनिधी)- सत्तासंघर्षाचा निकाल अंतिम टप्प्यात आला आहे. न्यायालयात झालेल्या सुनावणीवरुन ठाकरे गट उत्साहित आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी वलवकरच भाजपाला जोडून गेलेले आमदार शिवसेनेत येणार आहेत. मात्र एकनाथ शिंदे येणार नाहीत, त्यांना आम्ही घेणारही नाहीत, असे म्हणत निशाना साधला आहे.
नाशिकमध्ये बोलताना संजय राऊत म्हणाले की, सध्याचे राजकारण लोकांना ठावूक झाले आहे. लोक वैतागले आहे. सरकार ज्याप्रमाणे काम करत आहे. लवकरच हे सरकार पडणार असून शिवसेनेतून बाहेर पडलेला गट पुन्हा शिवसेनेत येणार आहे. मात्र एकनाथ शिंदे वगळता सर्व शिवसेनेत येतील, शिवाय आम्ही एकनाथ शिंदे यांना घेणार नाही, असे स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिले आहे. उद्धव ठाकरे यांची २६ मार्चला मालेगावला सभा होणार आहे. याचा आढावा संजय राऊत यांनी घेतला. यावेळी मालेगाव हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. तो गद्दारांचा नाही, असे म्हणत संजय राऊत यांनी दादा भुसेला टोला लगावला.या राज्याला मुख्यमंत्री नाही तर मख्खमंत्री आहेत. सगळी सूत्र देवेंद्र फडणवीस यांच्या हातात आहेत. मुख्यमंत्री फक्त ४०% आमदारांना एकत्र ठेवण्याचे काम करत आहेत, बाकी काही नाही. असेही संजय राऊत म्हणाले आहेत.
महाविकास आघाडीबद्दल बोलताना राऊत म्हणाले की “विधानसभा आणि लोकसभा निवडणूक एकत्र लढणार, जागा वाटपावरुन वाद होणार नाही याची खात्री मी देतो. महापालिका संदर्भात देखील चर्चा सुरु आहे, ज्या मोठ्या महापालिका आहेत, त्या ठिकाणी एकत्र लढण्याची इच्छा असल्याचे ते म्हणाले आहेत.