Latest Marathi News
Ganesh J GIF

अजित पवार गटाच्या मंत्र्यांना बंगले आणि दालनाचे वाटप

शिंदे गटाचे आमदार वेटिंगवरच, अजित पवारांनी अशुभ दालन नाकारले? वाचा संपूर्ण यादी

मुंबई दि ११(प्रतिनिधी)- उपमुख्यमंत्री अजित पवार हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सत्तेत सहभागी झाले. त्यांच्यासह राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. आठवड्यानंतरही खाते वाटप झाले नसले तरी आता बंगले आणि दालनांचे वाटप करण्यात आले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मंत्रालयात मुख्य इमारतीत सहाव्या मजल्यावरील दालन देण्यात आले आहे. या दालनाचे नूतनीकरण होईपर्यंत अजित पवार यांना विस्तारित इमारतीत पाचव्या मजल्यावर दालन देण्यात आले आहे. तर छगन भुजबळ यांना दुसऱ्या मजल्यावर, मुश्रीफांना चौथ्या मजल्यावर, वळसे पाटील तिसऱ्या मजल्यावर, धनंजय मुंडे यांना दुसऱ्या मजल्यावर, आदिती तटकरेंना पहिल्या मजल्यावर, अनिल पाटील यांना चौथ्या मजल्यावर तर संजय बनसोडे यांना तिसऱ्या मजल्यावर दालन देण्यात आले आहे. तर दुसरीकडे छगन भुजबळ यांनी सिध्दगड हा बंगला मिळाला. तर दिलीप वळसे-पाटील यांनी सुवर्णगड आणि हसन मुश्रीफ यांना विशालगड बंगला मिळाला आहे. पण अदिती तटकरे यांना दालन मिळाले असले तरी त्यांना अद्याप बंगल्यांचे वाटप झालेले नाही. दुसरीकडे अजित पवार यांचा मुक्काम देवगिरी बंगल्यावरच असणार आहे. विरोधी पक्षनेते असताना पवारांनी फडणवीसांना विनंती करत देवगिरी बंगला आपल्याकडे रहावा अशी विनंती केली होती, ती मान्य केली गेली होती.

बंगल्याचे वाटप
अजित पवार- देवगिरी
छगन भुजबळ – सिध्दगड
हसन मुश्रीफ – विशालगड
दिलीप वळसे-पाटील – सुवर्णगड
धनंजय मुंडे – प्रचितगड
धर्मरावबाबा आत्राम – सुरुचि-३
अनिल पाटील- सुरूचि- ८
संजय बनसोडे – सुरूचि – १८

दालन वाटप
अजित पवार-
छगन भुजबळ – मंत्रालय मुख्य इमारत, दुसरा मजला, दालन क्रमांक २०१
दिलीप वळसे-पाटील – मंत्रालय मुख्य इमारत, तिसरा मजला, दालन क्रमांक – ३०३
हसन मुश्रीफ – मंत्रालय विस्तार इमारत, चौथा मजला, दालन क्रमांक – ४०७
धनंजय मुंडे – मंत्रालय व विस्तार इमारत, दुसरा मजला, दालन क्रमांक २०१ ते २०४, २१२
धर्मरावबाबा आत्राम – मंत्रालय विस्तार, सहावा मजला, दालन क्रमांक ६०१,६०२, ६०४
अनिल पाटील- मंत्रालय मुख्य इमारत, चौथा मजला – दालन क्रमांक – ४०१
संजय बनसोडे – मंत्रालय मुख्य इमारत, तिसरा मजला, दालन क्रमांक – ३०१
अदिती तटकरे – मंत्रालय मुख्य इमारत, पहिला मजला, दालन क्रमांक – १०३

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!