Latest Marathi News
Ganesh J GIF

टोळक्याची कुल्फी विक्री करणाऱ्या पितापुत्रांना मारहाण

मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद, मारहाणीत पितापुत्र जखमी, परिसरात भीतीचे वातावरण

नांदेड दि ११(प्रतिनिधी)- नांदेड शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील वजीराबाद भागात क्षुल्लक कारणावरून कुल्फी विकणाऱ्या दोघांना तरुणाच्या टोळक्याने मारहाण केली. ही मारहाण सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

नांदेड शहरातील वजीराबाद भागात कुल्फी सेंटरच्या मालकाला किरकोळ कारणातून लाठ्या-काठ्या आणि फरशीने बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना सोमवारी घडली आहे. कुल्फीसेंटर समोर एक तरुण तरुणीसोबत वाद घालत होता. बराच वेळ वाद सुरू असल्याने कुल्फी सेंटरचे कांतीलाल शर्मा आणि चेतन शर्मा यांनी त्यांना हाकलले. त्यामुळे संतापलेल्या तरुणाने दहा ते पंधरा जणांना घेऊन कुल्फी सेंटरवर आला. या टोळक्याने पिता पुत्रांना मारहाण करण्यास सुरूवात केली. यात ते पितापुत्र जखमी झाले. दरम्यान ही मारहाण सीसीटीव्हीत कैद झाली आहे. पोलीस मारहाण करणाऱ्यांचा व्हिडीओ आधारे शोध घेत आहेत.

या घटनेनंतर काही काळ परिसरात भितीचे वातावरण पसरले होते. आतापर्यंत चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. नांदेडमध्ये अलीकडे मारहाणीच्या घटनात वाढ झाली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!