‘इज्जत प्रिय असेल तर सीमा हैदरला पाकिस्तानात परत पाठवा’
सीमा हैदरसाठी पाकिस्तानातील कुख्यात दरोडेखोराची धमकी, म्हणाला आमची मुलगी...
लखनऊ दि ११(प्रतिनिधी)- पाकिस्तानातून भारतात आलेल्या सामी हैदरची लव्ह स्टोरी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. आपल्या प्रियकरला भेटण्यासाठी भारतात आलेल्या सीमा हैदर ही विवाहित असून तिला चार मुले आहेत. सीमा आता सचिन बरोबर लग्न करुन भारतातच राहणार आहे. विशेष म्हणजे तिने हिंदू धर्म स्वीकारला आहे.
सीमा हैदर पाकिस्तानातून नेपाळमार्गे भारतात आली होती. सध्या सीमाचे पाकिस्तानातील कुटुंबीय सीमाला परत पाकिस्तानला पाठवा अशी मागणी करत आहेत. त्यातच आता पाकिस्तानमधला दरोडेखोर डाकू रानो शार यांनी सीमा हैदरला पाकिस्तानात परत पाठवा असे म्हटले आहे. सीमाला पाकिस्तानात पाठवले नाही तर मंदिरांवर हल्ले केले जातील अशी थेट धमकीच त्याने दिली आहे. तसेच हिंदू धर्मीयांवर हल्ले केले जातील असा इशारा दिला आहे. रानो शार एक व्हिडिओ जारी करत अपशब्द वापरत धमकी दिली आहेत, आम्ही कबीलेवाले आहोत, आमची मुलगी पाकिस्तानातून भारतात गेली आहे. पण आमची मुलगी आम्हाला परत केली नाही तर हिंदू मंदिरांवर हल्ले केले जातील. इज्जत प्रिय असेल तर तिला परत पाठवा अशा धमकीचा व्हिडीओ त्याने जारी केला आहे. दरम्यान सीमा हैदरने स्वत:ची वेशभूषा, चालिरीती आणि खाण्या-पिण्याच्या सवयीतही बदल केले आहेत. सीमा हैदर पूजाअर्चा करत असून तिने सचिनच्या नावाचे मंगळसूत्र आणि भांगेत कुंकूही लावले आहे.
(व्हिडीओत अनेक अपशब्द आहेत. त्यामुळे व्हिडिओ स्वतः च्या जबाबदारीवर पहावा)
सीमा हैदर ही पाकिस्तानातून आपल्या चार मुलांसह पळून भारतात आली आहे. तिचं म्हणणं आहे की PUBG ही गेम खेळताना ती सचिन नावाच्या युवकाच्या प्रेमात पडली. सचिन ग्रेटर नोएडामधल्या एका गावामध्ये राहतो. सीमाला पाहण्यासाठी लोक आता लांबून लांबून सचिनच्या घरी येत आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानामध्ये लोक त्याच्यावर चांगलेच भडकले आहेत.