लासलगावात व्यापा-याबरोबर जे घडले ते पाहुन चकित व्हाल
घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल, एकदा बघाच नक्की काय झाल
नाशिक दि २१(प्रतिनिधी)- अलीकडच्या काळात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यात भर म्हणजे आता चोरटे चारचाकी गाडीफोडून देखील चोरी करत आहेत. त्यामुळे चारचाकीमधील वस्तू अतिशय सुरक्षित आहेत आणि गाडी लॉक असताना कोणीही त्याला हात लावू शकत नाही, असा अनेकांचा समज फोल ठरला आहे. याचाच प्रत्यय देणारी एक घटना लासलगावमधून समोर आली आहे.
लासलगावमधला व्हिडीओ थक्क करणारा आहे. लासलगावच्या कोटमगाव येथे रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या कारची काच तोडून चोरट्याने साडेतीन लाख रुपये लंपास केले आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. एका व्यापाऱ्यांने बँकेतून काढलेले साडेतीन लाख रुपये पिशवीत ठेवले होते. ही पिशवी त्याने कारमध्येच ठेवली. कार रस्त्याच्या कडेला उभी करून हा व्यापारी मार्केटमध्ये गेला असता त्याच्यावर पाळत ठेवणाऱ्या चोरट्याने ही संधी साधत कारची काच तोडून रक्कम ठेवलेली पिशवी घेऊन पसार झाला. चोरीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पण या चोरीमुळे शहरात घबराटीचे वातावरण आहे.
चोराने आजूबाजूच्या लोकांना संशय येऊ नये यासाठी कारजवळ जाऊन उभा राहतो आणि अवघ्या १५ सेकंदाच्या आत कारची काच तोडून आतमधील पैसे लंपास करतो. आता पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्हीच्या आधारे या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.