…म्हणून त्या महिलेने पुरूषाला चप्पल आणि लाथाने बदडले
मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल, व्हिडिओ पाहुन तुम्ही संताप व्यक्त कराल
छत्तीसगड दि २१(प्रतिनिधी)- छत्तीसगडच्या अंबिकापुर मेडिकल कॉलेजमध्ये झोपलेल्या एका पुरुषाने महिलेला एका साधा प्रश्न विचारला म्हणून तीने चक्क महाभारत सुरु करत त्या पुरूषाला लाथा बुक्क्यानी मारहान केली आहे. एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.
व्हायरल व्हिडीओत संतप्त महिलेने एका पुरुषाने साधी विचारणा केल्याने चप्पलेने आणि लाथाबुक्क्यानी मारहाण केली आहे. अंबिकापुर मेडिकल काॅलेजच्या ओपीडीमध्ये एक पुरुष झोपला असताना एका महिलेने खोलीतील कुलर बंद केला यामुळे त्या व्यक्तीने महिलेला कुलर का बंद केला? असा प्रश्न विचारला. यावर महिलेने त्या पुरुषाला चपलेने मारहाण सुरुवात केली एवढचं नाही तर तिने शिव्यांची लाखोली वाहत त्याला लाथा सुद्धा घातल्या आहेत. यावेळी एका पुरुषाने देखील त्या झोपलेल्या व्यक्तीला काठीने मारहाण केली आहे. पोलीस आल्यानंतर हा वाद मिटवण्यात आला. यावेळी महिलेने एका रुग्णाला थंडी वाजत असल्यामुळे कुलर बंद केल्याचे सांगत मारहाण झालेला व्यक्ती फक्त कुलरच्या हवेत झोपण्यासाठी इथे आल्याचे सांगितले आहे.

पोलिसांनी महिलेला अटक न करता मारहाण झालेल्या व्यक्तीला ओपीडीतून निघून जाण्यास सांगितले आणि या
विषयावर पडदा टाकला.पण हा व्हिडीओ पाहून अनेकांनी मारहाण करणाऱ्या महिलेच्या अटकेची मागणी केली आहे. तसेच या प्रकरणाचा तपास करण्याची मागणी केली आहे. सध्या व्हिडिओ मात्र व्हायरल होत आहे.