Just another WordPress site

संजय राऊत यांची दिवाळी यंदाच्या वर्षी ‘या’ ठिकाणी

पत्राचार प्रकरणी अटकेत असलेल्या राऊतांबाबत न्यायालयाचा हा निर्णय

मुंबई दि २१(प्रतिनिधी)-  शिवसेनेचे नेते व खाजदार संजय राऊत यांना जामीन देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे त्यांची दिवाळी तुरुंगातच जाणार आहे. पत्राचाळ प्रकरणी राऊत यांना अटक करण्यात आली आहे. आता या प्रकरणी २ नोव्होबरला पुन्हा सुनावणी होणार आहे.

GIF Advt

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत १७ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली होती. न्यायालयाने संजय राऊत यांच्या कोठडीत पुन्हा एकदा वाढ केली आहे. आता संजय राऊताच्या जामीन अर्जावर थेट २ नोव्हेंबर रोजी सुनावणी केली जाणार आहे. राऊताचा कारागृहातील मुक्काम १३ दिवसांनी वाढला आहे. म्हणजेच, संजय राऊतांना २ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. गोरेगाव येथील पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात इडीणे राऊत यांना जून महिन्यात अटक केली होती.
शिवसेना खाजदार संजय राऊत पत्राचाळ घोटाळा प्रकरणी अटकेत आहेत. मुंबईतील गोरेगाव येथील पत्राचाळीच्या व्यवहारात लाभ मिळवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

महाराष्ट गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाचा भूखंड आहे. ईडीच्या आरोपानुसार, प्रवीण राऊत यांच्या गुरु आशीष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचे काम देण्यात आलं होत. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खाजगी बिल्डरांना विकला, असा आरोप आहे. प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!