Just another WordPress site

गर्दी जमवण्यासाठी शिंदे गटाकडून उद्धव ठाकरेंच्या आवाजाचा वापर

शिंदे ठाकरे गटात टीझर वाॅर, पहा शिंदे ठाकरे गटाची 'ही' जबरदस्त खेळी

मुंबई दि २(प्रतिनिधी) – दसरा मेळावा जसा जवळ येत आहे, तसा शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटात संघर्षाबरोबरच आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. शिवसेनेच्या दोन्ही गटातून पोस्टर आणि टीझर प्रदर्शित करण्यात आले आहेत.पण आता शिंदे गटाकडून गर्दी जमवण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या आवाजाचा वापर करण्यात आला आहे.

शिंदे गटाने दसरा मेळाव्याचा दुसरा टीझर रिलीज केला आहे. पण या टीझरमध्ये उद्धव ठाकरेचा आवाज वापरत शिंदे गटाने जबरदस्त खेळी खेळली आहे. या टीझरमध्ये उद्धव ठाकरेंच्या जुन्या भाषणाचा समावेश करण्यात आला आहे, त्यात ते राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर टीका करत आहे. या टीझरमध्ये शरद पवार, सोनिया गांधी यांच्या नावाचा देखील उल्लेख आहे. निष्ठा विचारांशी लाचारांशी नाही असे म्हणत विसर ना व्हावा अशी टॅग लाईन वापरण्यात आली आहे. पहिल्या टिझरमध्ये बाळासाहेब तर दुस-या टिझरमध्ये उद्धव ठाकरेंचा आवाज वापरल्याने शिंदे गटाला ठाकरेंशिवाय पर्याय नाही असा टोला शिवसेनेकडून लगावण्यात आला आहे.

GIF Advt

ठाकरे गटानेही दसरा मेळाव्याचा टीझर प्रदर्शित केला आहे. यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाची झलक दाखवण्यात आली आहे. एकाही आमदाराने बंडखोरी केली तर त्याला कायद्याची चिंता न करता तिथेच तुडवा, असं बाळासाहेब त्यात म्हणताना दिसत आहेत. दोन्ही गटातून गर्दी जमावण्याचे प्रयत्न सुरू असल्यामुळे दोन्ही नेते काय बोलणार, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!