Latest Marathi News

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचे बिगुल वाजले

शिवसेनेकडुन उमेदवार जाहीर, भाजपाचा शिंदे गटाच्या जागेवर दावा

मुंबई दि ३(प्रतिनिधी) – निवडणूक आयोगाकडून मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या बंडानंतर पहिल्यांदाच शिवसेना आणि शिंदे गट अधिकृतपणे लढणार आहेत. त्याचबरोबर चिन्हाचे काय होणार हे ही पहावे लागणार आहे.

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानूसार १४ ऑक्टोबरपर्यंत या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. त्यानंतर ३ नोव्हेंबरला अंधेरी पूर्व मतदारसंघात मतदान होईल. तर ६ नोव्हेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. उद्धव ठाकरे गटाकडून दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर शिंदे गटाकडून ही जागा आपल्याकडे घेतल्यानंतर आता भाजपाकडून मुरजी पटेल हे रिंगणात उतरणार आहेत. मनसे ही निवडणूक लढवणार की भाजपाला पाठिंबा देणार हे पहावे लागणार आहे. पक्ष चिन्हाचा प्रश्न निवडणूक आयोगाकडे असल्यामुळे पोटनिवडणूकीसाठी शिवसेनेला धनुष्यबाण हे चिन्ह वापरता येणार का? हे देखील पाहावे लागणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने अंधेरी पूर्वच्या जागेवर दावा सांगितला होता, मात्र भाजपने ही जागा हिसकावत शिंदे गटाला धोबीपछाड दिली आहे. तर शिवसेनेने उमेदवार दिल्यानंतर काँग्रेसने चर्चा न केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे या निवडणूकीत कोण बाजी मारणार हे पहावे लागणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!