Latest Marathi News

रील्स बनवणे एसटी कंडक्टरला पडले चांगलेच महागात

पहा या फेमस इंस्टाग्राम स्टार महिला कंडक्टरसोबत काय घडले

धाराशिव दि २(प्रतिनिधी)- ड्यूटीवर असताना रील्स बनवणे एका लेडी कंडक्टरला चांगलेच महागात पडले आहे. फेमस टिक टॉक स्टार आणि कळंब एसटी महामंडळात कंडक्टर असलेल्या मंगल सागर गिरीवर एसटी महामंडळाची प्रतिमा मलीन केल्याचा ठपका ठेवत निलंबित करण्यात आले आहे. ही कारवाई धक्कादायक असल्याचे गिरी म्हणाल्या आहेत.

धाराशिव जिल्ह्यातील मंगल सागर गिरी ही महिला कंडक्टरल म्हणून कार्यरत आहे. ती तिकिट काढत असताना किंवा प्रवाशांसोबत रिल्स बनवतात. तिचे सोशल मिडीयावर भरपुर फाॅलोअर्स आहेत. पण ऑन ड्यूटी असताना व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करणे तिला चांगलंच महागात पडले आहे. गिरी या धाराशिव जिल्ह्यातील कळंब आगारामध्ये कंडक्टर म्हणून नोकरीला आहेत. त्यांच्या व्हिडिओंना सोशल मीडियावर खुप लाईक्स आणि कमेंट मिळत असतात. त्यामुळे त्यांचे लाखो फॉलॉवर्स आहेत. काही दिवसापुर्वी त्यांनी कंडक्टरचा ड्रेस घालून तुळजाभवानी देवीच्या एका गाण्यावर व्हिडिओ बनवला होता. त्यांचा व्हिडिओ तुफान गाजला होता.पण एसटी महामंडळाची प्रतिमा मलीन झाल्याचे कारण देत निलंबित करण्यात आले आहे.

मंगल गिरी यांच्याबरोबरच त्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या सहकार्यालाही निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईने मंगल पुरी यांना मोठा धक्का बसला आहे. देवीच्या गाण्यावर व्हिडिओ बनवल्यामुळे एसटी महामंडळाची प्रतिमा मशीन कशी झाला असा सवाल गिरी यांनी उपस्थित केला आहे तर त्यांच्या फाॅलोअर्सनेही कारवाईचा निषेध केला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!