Latest Marathi News
Ganesh J GIF

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या पहिल्या उमेदवाराची घोषणा

राष्ट्रवादीकडून विधानसभेची तयारी सुरु, शरद पवार यांच्याकडून घोषणा, भाजपला आव्हान

पंढरपूर दि ७(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला अधयक्षपदाचा राजीनामा परत घेतल्यानंतर आपल्या कामाला सुरुवात केली आहे. त्याचबरोबर त्यांनी महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणूकीच्या पहिल्या उमेदवाराची घोषणा केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने आत्तापासूनच कामाला लागली आहे.

पंढरपूर तालुक्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी पवार यांनी कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. शरद पवार म्हणाले “नेतृत्व हे तयार केले जाते. तुम्ही लोकांनी  अभिजित पाटील यांचे नेतृत्व तयार केले आहे.तुम्ही नेतृत्व तयार केल्यानंतर आमच्यासारख्या नेत्यांची जबाबदारी आहे की त्यांच्या पाठीमागे उभे राहण्याची. तुम्ही त्याला उभं करा. मी एवढंच सांगतो की जेव्हा केव्हा निवडणुका येतील तेव्हा राष्ट्रवादीचा आमच्या सहकाऱ्यांचा, आमच्या महाविकास आघाडीचा लोकप्रिय उमेदवार या ठिकाणी कोण आहे तर अभिजीत पाटील यांचंच नाव घेतलं जाईल. त्याची तयारी तुम्ही करा, एवढंच यानिमित्ताने सांगतो, असे पवार म्हणाले आहेत. त्यामुळे पंढरपूर मधून अभिजित पाटील हे राष्ट्रवादीचे उमेदवार असणार आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत येथे भाजप विरुद्ध राष्ट्रवादीचे अभिजीत पाटील असा राजकीय संघर्ष पहायला मिळण्याची शक्यता आहे. कारण या ठिकाणी सध्या भाजपाचे समाधान आवताडे आमदार आहेत त्यांनी पोटनिवडणूकीत भगिरथ भालके यांचा पराभव केला होता. त्याआधी भारत भालके यांची या मतदारसंघावर पकड होती. अभिजीत पाटील यांनी पंढरपूर-मंगळवेढ्यातून आगामी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. निवडणुकीआधी राष्ट्रवादीत प्रवेश करून आपली उमेदवारी पक्की करून घेण्याच्या दृष्टीने पाटील गटाने ही रणनिती आखल्याचे बोलले जात आहे. पाटील यांनी कारखान्याच्या माध्यमातून मतदारसंघात आपला जनसंपर्क तयार केला आहे.

शरद पवार आज पंढरपूर दौऱ्यावर होते. यावेळी विठ्ठल साखर कारखान्याच्या बायो सीएनजी प्रकल्पाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. गुरसाळे येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पाटील यांनी मातब्बरांना धुळ चारत विजय मिळवला. त्यानंतर ते पाटील चर्चेत आले होते.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!