‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने दिली आपल्या प्रेमाची कबुली
क्रशचे नाव सांगत म्हणाली 'मला तो प्रचंड आवडतो, तर 'या' अभिनेत्रीबद्दल मोठा खुलासा
मुंबई दि ७(प्रतिनिधी)- मराठी चित्रपट अभिनेत्री आणि महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री शिवाली परब आपल्या बिनधास्त वक्तव्यामुळे चर्चेत असते. शिवालीने आपल्या अभिनयाच्या जोरावर आपला चाहता वर्ग तयार केला आहे. आता शिवाली पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने तिचा क्रश कोण आहे हे सांगितले आहे. त्यामुळे चर्चा होत आहे.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय विनोदी शो आहे. या शोच्या माध्यमातून अनेक कलाकार जगभरात लोकप्रिय झाले आहेत. शिवालीनं नुकतीच एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तिच्या क्रशचे नाव सांगितलं आहे. त्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. तिच्या चाहत्यांना तिचा क्रश कोण? हे जाणून घ्यायची इच्छा आहे. ति म्हणाली “मला शाहरुख खान खूप आवडतो. खूप म्हणजे प्रचंड आवडतो. कोणी विचार करू शकणार नाही इतकं माझं शाहरुखवर क्रश आहे. मी इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पाहते की तो सरप्राइज द्यायला कुठेकुठे भेटायला जातो आणि त्यांच्या फॅन्सना भेटून सरप्राइज देतो वगैरे. असं काही माझ्यासोबत व्हायला हवं अशी माझी इच्छा आहे. माझा शाहरुखवर खूप मोठं क्रश आहे. मी जबरदस्त मोठी त्याची फॅन आहे. असे शिवाली म्हणाली आहे. शिवाली ही लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. तिचं कोहली फॅमिलीचं स्किट तर प्रेक्षकांच्या लक्षाच राहिलेलं आहे. दरम्यान शिवालीने एका चित्रपटात देखील काम केले आहे.
शिवालीने प्राजक्ता माळीबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. प्राजक्ताविषयी सांगत शिवाली म्हणाली, प्राजूताई खूपच गोड आहे. ती खूप नम्र स्वभावाची आहे. रात्री जेव्हा शूटिंग संपते तेव्हा आम्ही सगळे खूप दमलेलो असतो. तेव्हा तिच्याकडे पाहून आम्हाला एनर्जेटिक फील होतं. जर काही चुकलं तर ती खूप चांगल्या प्रकारे सांभाळून घेते. ती खरंच खूप गोड आहे.’