बायको माहेरहून येत नसल्याने नव-याने केला भलताच प्रताप
नवरोबाला समजावताना पोलीसांची दमछाक, बघा नक्की काय घडल
जुन्नर दि १(प्रतिनिधी)- नवरा बायकोचं भांडण काही नवी नाहीत. पण कधी कधी ती भांडण भलतीच वाढतात आणि त्यातून बायको आपल्या माहेरी रहायला जाते. पण पुणे जिल्ह्यात एक भलतीच घटना घडली आहे. रुसलेली बायको माहेरून परत येत नाही म्हणून वैतागलेला नवरा थेट वीजेच्या टॉवरवर चढला होता. त्याचा हा कारनामा सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
जुन्नर तालुक्यातील केशव काळे याचे त्याच्या बायकोबरोबर कडाक्याचे भांडण झाले होते. त्यामुळे रुसलेली बायको माहेरी निघून गेली होती. त्यानंतर त्याने अनेकवेळा बायकोला आणण्याचा प्रयत्न केला. पण ती सासरी यायला तयार नव्हती. त्यामुळे वैतागलेक्या पती बायकोने परत यावे म्हणून थेट विजेच्या हायवॉल्टेज टॉवरवर चढला. या तरुणाला खाली उतरवण्यासाठी खूप प्रयत्न करण्यात आला. पण. जो पर्यंत बायको परत येणार नाही तो पर्यंत खाली उतरणार नाही असा निश्चय त्याने केला होता. अखेर पोलीसांनी शिष्टाई करत ‘त्या’ नव-याला खाली उतरवले. पण नवऱ्याचा हा शोले स्टाईल स्टंट सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. पण नवरोबाला या स्टंट केल्याचा मोठाच फायदा झाला आहे.

पोलिसांनी नवरोबाची समजूत काढण्यासाठी माहेरी जाऊन त्याच्या बायकोला परत आणलं. आणि मग त्या नवऱ्याला खाली उतरवून दोघांचे वाद सोडवले. आणि दोघांची त्यांच्या गावी रवानगी केली. त्यानंतर सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. त्यावर अनेकजण प्रतिक्रिया देखील देत आहेत.