त्यावेळी मागून एक व्यक्ती आला आणि त्याने माझे…
या प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितली लैंगिक शोषणाची घटना, भावुक अभिनेत्री होती घाबरलेली
मुंबई दि ९(प्रतिनिधी)- बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर ही इंडस्ट्रीतील सर्वात स्टायलिश अभिनेत्रींपैकी एक आहे. अनिल कपूरची मुलगी खूप आलिशान आयुष्य जगत आहे. पण सोनम कपूर लैंगिक शोषणाची शिकार झाली आहे. तिनेच याबाबत धक्कादायक खुलासा केला आहे.
सोनम कपूरने नुकतीच ‘अक्ट्रेस राऊंडटेबल’ या राजीव मसंद यांच्या शोला हजेरी लावली होती. यावेळी तिने तिच्या खासगी जीवनाबद्दल मोठे खुलासे केले आहेत. यावेळी तिने तिच्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला आहे. सोनम म्हणाली की, “प्रत्येकजण बालपणात कधी ना कधी लैंगिक शोषणाचा बळी पडतो. मला माहित आहे की माझ्या लहानपणी माझाही विनयभंग झाला होता आणि तो माझ्यासाठी खूप मोठा आघात होता. सुमारे दोन-तीन वर्षे मी याबद्दल कोणालाही सांगितले नव्हते. ती घटना मला आजपर्यंत पूर्ण आठवते, ही घटना मुंबईतील गेटी गॅलेक्सी थिएटरमधील आहे जिथे ती तिच्या मैत्रिणींसोबत चित्रपट पाहण्यासाठी गेली होती. सर्व लोक काही खाण्याचे साहित्य घेण्यासाठी बाहेर आले होते तेव्हा मागून एक माणूस आला आणि त्याने माझे स्तन दाबले. हे उघड आहे की मी तेव्हा तरुण होते, त्यामुळे माझा फिगर आतासारखा नव्हता. पण जेव्हा माझ्यासोबत हे घडलं तेव्हा मी खूप घाबरून गेले होते. मला काय होत आहे ते समजले नाही आणि मी तिथेच रडायला लागले. पण मी याबद्दल कोणाशीही बोलले नाही. मी परत आत बसले आणि संपूर्ण चित्रपट पाहिला कारण त्यावेळी मला वाटले की मी काहीतरी चूक केली आहे.” असा खुलासा तिने केला आहे. सोनम अभिनेत्रीसोबतच एक ग्लॅमरस फॅशन डिझायनर देखील आहे. दरम्यान सोनमने २०१८मध्ये आनंद अहुजाशी लग्नगाठ बांधली आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सोनमने गोंडस बाळाला जन्म दिला. सोनमने आपल्या मुलाचं नाव त्यांनी ‘वायू’ ठेवले आहे.
सोनम कपूरने ‘सावंरिया’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदापर्ण केले होते. या अभिनेत्रीचा पहिलाच चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता.तिचे त्यानंतर ‘निरजा’, ‘रांझणा’, ‘वीरे दी वेडिंग’, ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपट चांगलेच गाजले. पण मॉडेलिंग विश्वातील प्रसिद्ध नाव सोनम कपूरला अभिनेत्री बनण्याची इच्छा कधीच नव्हती. सोनम कपूरने तिच्या फिल्मी करिअरमध्ये जवळपास २० चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र, यापैकी केवळ ५-६ चित्रपटच बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले. पण सध्या ती मातृत्वाचा आनंद घेत आहे.