Just another WordPress site

अल्पवयीन मुलीवर जंगलात नेऊन अनैसर्गिक अत्याचार

अमरावतीतील कायदा सुव्यवस्था कोणाच्या भरोशावर?

अमरावती दि १५ (प्रतिनिधी)- अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यात एका अल्पवयीन मुलीला मेळघाटच्या घनदाट जंगलात पळवून नेऊन तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अमरावतीत महिला अत्याचारात वाढ झाल्याने संताप व्यक्त होत आहे.

GIF Advt

अत्याचाराची घटना १२ आॅगस्टला घडली आहे. या प्रकरणी पोलीसांनी प्रदीप बाबू कासदेकर याला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी प्रदीपने एका अल्पवयीन मुलीला फूस लावून एका शिवारात नेऊन तिच्याशी बळजबरीने शारीरिक अत्याचार केले. मुलीने कशीबशी आरोपीच्या तावडीतून सुटका करत घर गाठले आणि घडलेली घटना पालकांना सांगितली. अमरावतीचे देशपातळीवर नवनीत राणा महिला नेतृत्व करतात शिवाय या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद यशोमती ठाकूर यांच्याकडे होते. तरीही महिला अत्याचार वाढल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

अमरावती जिल्ह्यात सातत्याने महिला आणि मुली गायब होत असल्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे.घनदाट जंगल आणि वेडलेल्या चिखलदरा आणि धारणी तालुक्यातील या भागात सातत्याने महिलावर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!