Latest Marathi News
Ganesh J GIF

घरमालक-भाडेकरूंनो लक्ष द्या! देशभरासह महाराष्ट्रात नवीन ‘रेंट नियम’ लागू; डिपॉझिटपासून भाड्यापर्यंत मोठे बदल.

भाडे व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणि न्याय निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारच्या मॉडल भाडे कायदा वर आधारित नवीन भाडेकरार नियम लागू करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातही हे नियम १ जानेवारी २०२६ पासून अमलात आले असून यामुळे भाडेकरू आणि घरमालक दोघांचे हक्क सुरक्षित होणार आहेत.लेखी व नोंदणीकृत करार बंधनकारक आहे.

नवीन नियमांनुसार आता तोंडी किंवा फक्त नोटरी केलेला करार मान्य राहणार नाही. घरमालक आणि भाडेकरू यांच्यात लेखी करार असणे आवश्यक आहे. हा करार ६० दिवसांच्या आत ऑनलाइन नोंदणी (ई-रजिस्ट्रेशन) करणे बंधनकारक आहे. नियम न पाळल्यास दंड होऊ शकतो.

सुरक्षा ठेव मर्यादित.निवासी घरांसाठी जास्तीत जास्त दोन महिन्यांचे भाडे इतकीच डिपॉझिट घेता येईल. व्यावसायिक जागांसाठी ही मर्यादा सहा महिन्यांपर्यंत आहे. यामुळे भाडेकरूंवर आर्थिक भार कमी होईल.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!