Just another WordPress site

मामीचा जडला भाच्यावर जीव पण नंतर घडले असे काही…

धक्का बसलेल्या मामाची पोलिसात धाव,पण पोलिसही हैराण

राजस्थान दि १८ (प्रतिनिधी)- राजस्थानमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मामीला भाचा आवडू लागल्यामुळे दोघांनी चक्क एकत्र राहण्याबरोबरच लग्न करण्याचा निर्णय घेतला. यामुळे धक्का बसलेल्या मामाने पोलिसांत पत्नी आणि भाच्याविरोधात तक्रार दिली आहे.

GIF Advt

मिळालेली मसहिती अशी की राजस्थानमध्ये एक अल्पवयीन भाचा आपल्या मामाकडे येत-जात होता. येत जात असताना मामीचे आणि त्याचे सूत जुळले. मामाला हा प्रकार समजताच त्याला मोठा धक्का बसला.आणि मामी-भाच्याचे प्रेमप्रकरण थेट पोलिस ठाण्यात गेले. मामाने पोलिसांत पत्नी आणि भाच्याविरोधात तक्रार दिली आहे. त्याच्या तक्रारीनुसार त्याचे १० वर्षांपूर्वी या महिलेशी लग्न झाले होते. तिच्यापासून दोन मुले आहे. त्याला एक बहीण आहे. तिचा मुलगा अल्पवयीन आहे. तो नेहमी घरी येत जात होता. यावेळी दोघांमध्ये प्रेमसंबंध तयार झाले आणि त्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच पत्नीने आपल्या पतीला भाच्यासोबत रहायला जाणार असल्याचे सांगितले. शिवाय, भाच्यासोबत लग्न केल्याचाही दावा तिने केला, पण आपण पत्नीला घटस्फोट दिला नसल्याने त्यांनी केलेले लग्न हे कायदेशीर नसल्याचे मामाने म्हटले आहे. यामुळे पोलीसांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

दोघांच्याही कुटुंबीयांनी दोघांनाही समजविण्याचा प्रयत्न केला. तुम्ही लग्न करू नका असे सांगितले. पण, दोघेही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. दोघांनी एकत्रच जगणार आणि मरणार असल्याचा निर्धार केला आहे. मामीने तर थेट मामासोबत जाण्यास नकार दिला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!