Just another WordPress site

एसीबीच्या चौकशीची धमकी देऊन मला सुरतला नेण्यात आले…

शिंदें गटासोबत सुरतला गेलेल्या आमदाराचा धक्कादायक गौप्यस्फोट

अकोला दि १९ (प्रतिनिधी)- आपल्यासोबत न आल्यास एसीबीकडून चौकशीची धमकी देऊन आपल्याला सुरतला नेल्याचा गंभीर आरोप आमदार नितिन देशमुख यांनी केला आहे. शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंडखोरी करून आमदारांनी सुरत व्हाया गुवाहाटी गाठले होते. या सत्ता नाट्यानंतर आमदार नितीन देशमुख यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.

अकोला जिल्ह्यातील ठाकरे समर्थक शिवसेना आमदार नितीश देशमुखांनी जाहीर कार्यक्रमामध्ये हा धक्कादायक गौप्यस्फोट केला.देशमुख म्हणाले की, “बंडखोरी न केल्याने मला एसीबीकडून चौकशीची धमकी देण्यात आली होती. ईडी आणि एसीबीची धमकी देता, आम्हीच येतो आम्हाला खुशाल जेलमध्ये टाका, या पक्षासाठी आम्ही जेलमध्येही जाण्यास तयार आहोत. जे कारवाई करण्याची धमकी देत आहे ना, त्या बंडखोरीचा मी साक्षीदार आहे. पैसे घेऊन सत्तांतर घडवलं आहे. गेल्या दीड वर्षांपासून महाराष्ट्र सरकार पाडण्यासाठी षडयंत्र चालू होतं.त्याच्या क्लिप आपल्याकडे आहेत असा आरोपही देशमुख यांनी केला.”बाळासाहेबांचे विचार आम्हाला पुढे न्यायचे होते, म्हणून आम्ही उठाव केला, असं जे महाराष्ट्रातले नेते सांगतात ना त्यांच्या आवाजाची क्लिप जर मी बाहेर काढून दाखवली, तर त्यांना बोलायला जागा राहणार नाही.असा इशाराही देशमुख यांनी दिला आहे.

GIF Advt

“महाराष्ट्रात पैशाने सत्तांतर झालं हे जर मी सिद्ध करून दाखवलं नाही तर या महाराष्ट्राच्या विधानसभेत आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही, असेही देशमुख म्हणाले आहेत. एकनाथ शिंदेंनी बंड केलं तेव्हा आमदार देशमुखसुद्धा त्यांच्यासोबत सुरतला गेले होते. पण तिथे गेल्यानंतर ते आजारी पडले होते.अखेर ते माघारी येण्यात यशस्वी ठरले होते.पण त्यांच्या आरोपामुळे खळबळ उडाली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!