
कमालच! लग्नाच्या वरातीत दोन जावांचा धमाकेदार डान्स
जाऊबाई जोरात, दोन जावांचा डान्स सोशल मिडीयावर जोरदार हिट, तुम्हीही व्हाल थक्क
मुंबई दि १८(प्रतिनिधी)- सोशल मिडीया हे मनोरंजक आणि प्रसिद्धीचे लोकप्रिय माध्यम बनले आहे. यामुळे अनेकांचे मनोरंजक होते. तर काहीजण रातोरात प्रसिद्ध होतात. त्यात लग्नातील व्हिडिओ तर भन्नाट व्हायरल होत असतात. सध्या सोशल मिडीयावर दोन जावांच्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
आपल्या संस्कृतीत लग्नाला विशेष महत्व आहे. लग्नात अनेकांच्या नजरा नवरा किंवा नवरी यांच्यावर खिळलेल्या असतात. पण कधी कधी लग्नात नव्या नवरीच्या जाऊबाई भाव खावून जातात. अनेक हिंदी चित्रपटात तसे दाखवण्यात आले आहे. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका लग्नातील आहे. यात दोन जावा मंडपात बेभान होऊन नाचताना दिसत आहे. या दोन जावांपैकी एक नववधू आहे तर दुसरी तिची जाऊबाई आहे. पण दोघांची डान्सची केमेस्ट्री चांगलीच जमली आहे. हा व्हिडिओ पाहून अनेक युजर्सनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. rutu_vinu या अकाउंटवरु हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडिओ ट्रेंडिंगवर देखील आला आहे.
जाऊबाई जोरात म्हणत अनेकांनी या डान्सचे काैतुक केले आहे. अनेकांनी असेच खुश रहा अशी कमेंट केली आहे. तर अनेकांनी बहिणी वाटता असे म्हणत प्रतिक्रिया दिली आहे. हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय बनला आहे.