Latest Marathi News
Ganesh J GIF

बांग्लादेश भारताला पराभूत करण्यात यशस्वी झाला तर मी…

पाकिस्तानी अभिनेत्रीची बांगलादेशला मोठी ऑफर, पाकिस्तानच्या पराभवाचा बदला घेण्याची मागणी, कोण आहे ती?

मुंबई दि १८(प्रतिनिधी)- विश्वचषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा सलग आठव्यांदा दारूण पराभव केला. यामुळे पाकिस्तानमध्ये संतापाचे वातावरण आहे. त्यामुळे आता पुढील सामन्यात तरी भारताचा पराभव व्हावा अशी अपेक्षा पाकिस्तानमधून केली जात आहे. पण पाकिस्तानच्या पराभवामुळे निराश झालेल्या एका पाकिस्तानी अभिनेत्रीने बांगलादेशच्या खेळाडूंना मोठी ऑफर दिली आहे.

गुरूवारी पुण्यात भारत विरूद्ध बांग्लादेशचा सामना पार पडणार आहे. पण स्वतःच्या संघाकडून अपेक्षाभंग झाल्याने आता पाकिस्तानमधील काही लोक उद्याच्या सामन्यात बांग्लादेशने भारताचा पराभव करावा अशी इच्छा व्यक्त करत आहेत. त्यामुळे पाकिस्तानी अभिनेत्री सेहर शिनवारीने बांगलादेश खेळाडूंना मोठी ऑफर दिली आहे. तिने एक्सवर एक पोस्ट करत ही आॅफर दिली आहे ती म्हणाली की, “इंशाअल्लाह माझे बंगाली मित्र पुढच्या सामन्यात आमच्याकडून बदला घेतील. जर त्याचा संघ भारताला पराभूत करण्यात यशस्वी झाला. तर मी बंगाली मुलासोबत फिश डिनर डेट करेन.” या वक्तव्यानंतर तिला सोशल मीडियावर भारतीय चाहत्यांकडून खूप ट्रोल केले जात आहे. सहारने भारतीय क्रिकेट संघाबाबत अशी विधाने करण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधीही ती प्रसिद्धीझोतात येण्यासाठी अशी विधाने केली आहेत. दरम्यान विश्वचषकात भारताने पाकिस्तानला वाईट पद्धतीने पराभूत केले, त्यानंतर पाकिस्तानी मीडिया आणि त्यांचे चाहते धक्का बसले आहेत. आता पुढच्या सामन्यांमध्ये पाकिस्तानच्या विजयासाठी प्रार्थना करण्याऐवजी भारताच्या पराभवाची स्वप्ने पाहण्यात धन्यता मानत आहेत. आता तिची ही इच्छा पूर्ण होणार की परत तिच्या पदरी निराशा पडणार याचा फैसला लवकरच होणार आहे.

https://x.com/SeharShinwari/status/1713466151013929313?s=20

विश्वचषक स्पर्धेत भारताने आतापर्यंत एकूण तीन सामने खेळले आहेत. हे तिन्ही सामने भारताने जिंकले आहेत. भारताने ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानचा पराभव केला आहे. भारताचा त्यांचे पुढील सामने अनुक्रमे बांगलादेश, न्यूझीलंड, इंग्लंड, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्सविरुद्ध खेळायचे आहेत. भारतीय संघ सध्या फार्मात दिसत आहे. त्यामुळे उद्या जोरदार लढत होऊ शकते.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!