Latest Marathi News
Ganesh J GIF

कमालच! या अभिनेत्रीने अभिनेत्याचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख

अभिनेत्रीचे ट्विट सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल, नेटक-यांनी घेतली अभिनेत्रीची शाळा, म्हणाले दारू...

मुंबई दि २८(प्रतिनिधी)- बाॅलीवूडबरोबर साऊथमध्ये आपल्या अभिनयाचा प्रभाव टाकणारी अभिनेत्री म्हणून उर्वशी रोैतेला ओळखली जाते. उर्वशी रौतेला सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. बऱ्याचदा ती तिच्या पोस्टमुळे ट्रोल होत असते. आता तिने नुकत्याच केलेल्या एका ट्वीटमुळे नेटकरी तिच्यावर नाराजी व्यक्त करत आहेत. तिच्या अगाध ज्ञानाबद्दल लोकांनी तिला चांगलेच ट्रोल करत आहेत.

उर्वशीचा ब्रो चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. उर्वशीच्या चुकीमुळे इंटरनेटवर नेटकऱ्यांनी तिची चांगलीच खिल्ली उडवली आहे. कारण तिचा सहअभिनेता पवन कल्याण या चित्रपटातील हिरो आहे. अभिनेत्रीनं या चित्रपटानिमित्त सोशल मिडियावर ही पोस्ट टाकली होती. तीने पोस्टमध्ये लिहिते की, आंध्र प्रदेशच्या आदरणीय मुख्यमंत्र्यांसोबत स्क्रीन स्पेस शेअर करताना आनंद झाला..पवनकल्याण आमच्या #BroTheAvatar चित्रपटात उद्या #२८ जुलै रोजी जगभरात प्रदर्शित होत’. काही वेळात तिचं हे ट्विट सोशल मिडियावर व्हायरल झालं अन् नेटकऱ्यांनी तिला अक्कल शिकवायला सुरुवात केली. नेटकऱ्यांनी तिला आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी आहेत असं सांगत तिच्या ज्ञानात भर टाकली. तर काही नेटक-यांनी तिला ट्रोल केले आहे. एका नेटकऱ्याने कमेंट केली आहे की, ‘ट्वीट करताना थोडं भान ठेव, दारू पिऊन ट्वीट करू नकोस,’ तर दुसऱ्याने लिहिले आहे की, ‘ही स्वघोषित मिस युनिव्हर्स आहे. आधी चित्रपटाचे कथानक टाकून टीमचा बदला घेणे आणि नंतर नायकाला मुख्यमंत्री म्हणून ट्रोल करणे.’ उर्वशी तशी कायमच चर्चेत असते. रिषभ पंत बरोबर तिचे नाव कायमच जोडले जाते. उर्वशी गेल्या काही दिवसांपासून क्रिकेटर ऋषभ पंतमुळे चर्चेत आली होती. उर्वशीला २०१५मध्ये मिस डीवा युनिव्हर्सचा खिताब मिळाला होता.

 

‘ब्रो’ हा एक तेलुगू चित्रपट आहे. यामध्ये पवन कल्याण, साई धरम तेज, केतकी प्रकाश, व प्रिया प्रकाश वारियर हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटातील एका गाण्यामध्ये उर्वशी रौतेला झळकणार आहे. उर्वशी अनेक प्रोजेक्टमध्ये सध्या व्यस्त आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!