Latest Marathi News
Ganesh J GIF

महाराष्ट्राची क्रश असणाऱ्या अभिनेत्रीला मिळाला जीवनसाथी?

सोशल मिडीयावरील त्यापोस्टची जोरदार चर्चा, अभिनेत्री आनंदात म्हणाली की, सख्या रे....

मुंबई दि २८(प्रतिनिधी)- महाराष्ट्राची क्रश म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. महाराष्ट्राची हास्यजत्रा आणि माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेल्या अभिनेत्री प्राजक्ता माळीने मराठी कलाविश्वात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिनयाबरोबरच आता प्राजक्ताने बिझनेसवुमन म्हणून प्रसिद्धी मिळवली आहे. प्राजक्तराज हा तिचा ब्रँड लोकप्रिय आहे. पण आता ती पुन्हा चर्चेत आली आहे.

प्राजक्ता माळीने अलीकडेच मनोरंजन विश्वातील आपल्या एका जवळच्या मैत्रिणीला प्राजक्तराजचा ‘तन्मणी’ गिफ्ट दिला आहे. अश्विनी कासार ही प्राजक्ताची चांगली मैत्रीण आहे. अभिनेत्री अश्विनी कासारने साडी नेसून त्यावर प्राजक्ताने गिफ्ट दिलेला ‘तन्मणी’ परिधान केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिला प्राजक्ताने दिलेले गिफ्ट फारच आवडले आहे. व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी या दोन्ही अभिनेत्रींचे कौतुक केले आहे. महत्वाचे म्हणजे प्राजक्ताने दागिन्यांच्या संचातील एक संच अमृता खानविलकरला भेट म्हणून दिला आहे. अमृताने इन्स्टाग्रामला याबद्दल एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात तिने हे दागिने प्राजक्ता माळीकडून घेतल्याचे सांगितले होते. यापूर्वी प्राजक्ताने अभिनेत्री वनिता खरातला लग्नानिमित्त दागिने गिफ्ट दिले होते. प्राजक्ता माळीने अभिनय आणि व्यवसाय सांभाळून अलीकडेच कर्जतमधील नव्या फार्महाऊसची झलक सोशल मीडियावर शेअर केली होती. प्राजक्ताच्या नवीन घराचं नाव खुपच खास आहे. प्राजक्तकुंज असे तिच्या घराचे नाव आहे. सध्या तिची प्रत्येक पोस्ट व्हायरल होत आहे.

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. प्राजक्ताचं करिअर सध्या सुसाट सुरु आहे. ती श्रीश्री रविशंकर यांची भक्त आहे. प्राजक्ता माळी सध्या आर्ट ऑफ लिव्हिंगचा कोर्स करतेय. तर दुसरीकडे तिने सख्या रे घायाळ मी हरिणी असे कॅप्शन असलेले फोटो शेअर केले होते. त्यावर चाहत्यांच्या भन्नाट कमेंट आल्या आहेत.ति प्रेमात आहे की सन्यासी होणार असा प्रश्न पडला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!