Latest Marathi News
Ganesh J GIF

बच्चू कडू यांनी आपल्याच सरकारमधील मंत्र्याला झापले

शिंदे सरकारमधील बेबनाव पुन्हा एकदा चव्हाट्यावर

अमरावती दि २१(प्रतिनिधी)- अमरावतीत आयोजित कृषी आढावा बैठकीत आमदार बच्चू कडू यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची चांगलीच हजेरी घेतली.कृषी विभागातील रिक्त पदावरून शिंदे सरकारला घरचा आहेत दिला त्यामुळे शिंदे गटात सर्वच आलबेल नसल्याचे दिसून आले. यामुळे विरोधकांना आयते कोलीत मिळाले आहे.

कडू यांनी कृषी विभागातील रिक्त पदे आणि इतर प्रलंबित मुद्दे उपस्थित करत स्वतःच्यस सरकारला कोंडीत पकडत प्रश्नांची सरबत्ती केली. शेतकऱ्यांना ताकत देणारा कृषी विभागालाच ताकत देण्याची वेळ आली आहे. रिक्त पदांमुळे कर्मचाऱ्यांवर व ताण असून, राज्यात बहुतांश कृषी कार्यालये भाड्याच्या इमारतीत आहेत. हे प्रश्न सोडवा, असे म्हणत आमदार बच्चू कडू यांनी आपल्याच सरकारला घरचा आहेर दिला.तालुकास्तरावर आधीच कर्मचारी संख्या कमी असताना प्रतिनियुक्तीमुळे बोटांवर मोजण्याइतकेच कर्मचारी कार्यालयात हजर राहतात. त्याच कर्मचाऱ्यांना सर्वेक्षण कृषिविषयक योजनांची अंमलबजावणी करणे व इतर कामे करावी लागतात. त्यामुळे कृषी विभागाची मुळ कामे बाजूला राहत आहेत.त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत असल्याचे म्हणत कडू यांनी संताप व्यक्त केला. आमदार कडू यांच्या या मुद्दयावर कृषिमंत्री अब्दुल सत्तार मात्र निरुत्तर झाल्याचे पाहायला मिळाले.


शिंदे फडणवीस सरकारला समर्थन देऊनही मंत्रिपद न मिळाल्याने आमदार बच्चू कडू सरकारवर नाराज आहेत त्यांनी आपली नाराजी उघडपणे बोलूनही दाखवली आहे. आज तर त्यांनी सरकारमधील उणीवा उघडपणे दाखवत एक प्रकारे एकनाथ शिंदे यांना सूचक इशारा दिला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!