बाबरी पाडण्यात बाळासाहेब ठाकरे व शिवसैनिक नव्हते
मंत्री चंद्रकांत पाटलांचा खळबळजनक दावा, ठाकरे गट आक्रमक, शिंदे गट अडचणीत
मुंबई दि ११(प्रतिनिधी)- बाबरी मस्जिद पडून त्या ठिकाणी आता श्रीरामाचे मंदिर उभारले जात आहे मात्र तरीही यावर आजही अनेक खुलासे नेतेमंडळींकडून केले जात आहे. यातच भाजपच्या एका मंत्र्यांच्या विधानावरून राजकारण पेटले आहे. भाजपा आणि ठाकरे गटात यावरून जोरदार प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.
बाबरी मस्जिद पडली तेव्हा अयोध्येत दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे व शिवसैनिक यापैकी कोणीही नव्हते असा खळबळजनक दावा भाजप आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना म्हणाले की, “त्यावेळी बाबरी मशिदीचा ढाचा पडल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की याची जबाबदारी मी घेतो. जबाबदारी मी घेतो याचा अर्थ काय? बाळासाहेब ठाकरे तिथे गेले होते की शिवसेना तिथे गेली होती की बजरंग दल तिथे होतं? कारसेवक कोण होते? हे सरसकट घेण्याची गरज नाही. कारसेवक हे हिंदू होते. कारसेवक हे बजरंग दलाच्या नेतृत्वाखाली गेले होते. ते असं म्हणत नव्हते की आम्ही बजरंग दलाचं नाव घेणार नाही. सगळ्यांनी नेतृत्व मान्य केलं होतं की हेच करू शकतील आणि त्यांनी केलं ते. ज्यांनी बाबरी मशिद पाडली, ते शिवसैनिक नव्हते.” त्यानंतर एका पत्रकार परिषदेत बोलताना बाबरी पाडण्याच्या मागणीला साडेपाचशे वर्षाचा इतिहास आहे. बाबरी पाडण्यामागे बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद आघाडीवर होते हे सर्वांनी माहिती आहे. त्यात शिवसेना हिंदुत्ववादी म्हणून असतील, पण बाबरी पाडण्याचा प्लॅन सेनाभवनमध्ये केला, असं काही नसल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यानंतर ठाकरे गटाने जोरदार हल्लाबोल केला आहे. जी भाजपा सत्तेत बसली आहे, त्यासाठी अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिका महत्त्वाच्या आहेत. बाळासाहेब ठाकरे बाबरी पाडल्याच्या प्रकरणात लखनौला CBI च्या विशेष न्यायालयात हजर झाले होते त्यांना प्रमुख आरोपी बनवले होते. हे भाजप नेत्यांना माहिती नाही का? ज्यांना तुम्ही विकत घेतलंय, त्यांच्या तोंडाला कुलूप का लागलंय?” असा सवालही संजय राऊत यांनी विचारला आहे.