Latest Marathi News
Ganesh J GIF

…तर भाजपाचे राधाकृष्ण विखे पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार?

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाला राम राम, शिंदेच्या अयोध्या दाै-यात भाजपाचे राजकीय समीकरण फिक्स

मुंबई दि ११(प्रतिनिधी)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच अयोद्धा दाैरा केला. पण एकनाथ शिंदे यांचा हा अयोद्धा दाैरा मुख्यमंत्री म्हणून अखेरचा ठरण्याची शक्यता आहे. कारण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावरून लवकरच पायउतार होऊन राधाकृष्ण विखे पाटील मुख्यमंत्री होण्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेवर लवकरच निर्णय येण्याची शक्यता असून, हा निकाल शिंदे गटाच्या विरोधात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे निकाल विरोधात गेल्यास शिंदेची आमदारकी रद्द होऊन मुख्यमंत्री पद सोडावे लागणार आहे. त्यानंतर बहुमतात असलेला भाजपावर या सर्व घडामोडींचा आरोप होऊ नये त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याएैवजी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. कारण मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना पसंती दिल्यास राजकीय महत्वाकांक्षेचा आरोप होऊन भाजपाला आगामी निवडणूकीत फटका बसण्याची शक्यता आणि नेमके तेच भाजपाला नको असल्यामुळे अमित शहा यांनीच विखे पाटील यांच्या नावाला पसंती दिली आहे. यातुन भाजपा महाविकास आघाडीला एक इशारा देणार असल्याचीही चर्चा आहे. कारण महाविकास आघाडीत राष्ट्रवादी महत्त्वाचा पक्ष आहे आणि शरद पवार आणि विखे पाटील यांच्यातील राजकीय वैर पूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. त्यामुळे विखेना मुख्यमंत्री करून शरद पवार यांच्यावर राजकीय कुरघोडी करण्याचा भाजपाचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचा अखेरचा दाैरा आहे का पासून राधाकृष्ण विखे पाटील मुख्यमंत्री होणार का या सर्व प्रश्नांची उत्तरे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरच मिळणार आहेत.

राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडणार या विधानावर बोलताना विखे पाटील यांनी ” समाज माध्‍यमांमधून माझ्या संदर्भात पसरविले जाणारे वृत्‍त हे कपोलकल्‍पीत आणि मला बदनाम करण्‍याचे षडयंत्र आहे. याप्रकारच्या वावड्या पसरविण्‍याचे काम काही मंडळी करीत आहेत. माझी बदनामी करण्‍याच्‍या हेतू आहे. यामध्‍ये कोणतेही तथ्‍य नाही असा खुलासा केला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!