Latest Marathi News
Ganesh J GIF

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी

धमकीचे पुणे कनेक्शन समोर, धमकीचे कारण एैकून पोलिसही हैराण, बघा कारण

मुंबई दि ११(प्रतिनिधी)- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याच्या धमकीचा कॉल आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. ‘मी एकनाथ शिंदे यांना उडवणार आहे’, अशी धमकी देत कॉल कट झाला. मुंबईसह राज्यातील पोलिस धमकी देणाऱ्याला पुण्यातून ताब्यात घेण्यात आले आहे.

सोमवारी ११२ वर फोन आला ज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. “मी एकनाथ शिंदे यांना उडवणार आहे” असं बोलून कॉलरने कॉल कट केला. नागपूरमध्ये हा कॉल आला होता. या कॉलनंतर पोलीस सतर्क झाले. पोलिसांना मिळालेल्या लोकेशननुसार कॉल पुण्यातील वारजे इथून आला होता. त्यानंतर पोलीस या ठिकाणी पोहोचले आणि एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा व्यक्ती दारुच्या नशेत होता. पहिल्यांदा त्याने अॅम्ब्युलन्ससाठी कॉल होता. पण अॅम्ब्युलन्स न आल्याने त्याने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उडवून टाकण्याची धमकी दिली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरु आहे. दरम्यान आरोपी  मुंबईतील अंबिका लेदर्समध्ये काम करत असल्याची माहिती मिळाली आहे. पुणे क्राईम ब्रँचने आरोपीला ताब्यात घेतले आहे. राजेश आगवणे असे आरोपीचे नाव आहे.

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात धमक्यांचं सत्र सुरुच आहे. भाजपचे नेते नितीन गडकरी यांना कारागृहातून धमकीचा फोन आला होता. त्यानंतर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनाही धमकीचा फोन आला. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी आली आहे. त्यामुळे प्रशासनाने कठोर निर्णय घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!