Latest Marathi News

रश्मिका मंदानाकडे चाहत्याने केली विचित्र मागणी

चाहत्याच्या मागणीचा व्हिडिओ व्हायरल, रश्मिकाचे लाजवाब एक्सप्रेशन

मुंबई दि २८(प्रतिनिधी) – अभिनेत्री रश्मिका मंदाना आज लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करत आहे. म्हणून तिला नॅशनल क्रश म्हटले जाते. त्यामुळे तिचे फॅन फॉलोइंगही मोठा आहे. त्यामुळे रश्मिका ज्या ज्या कार्यक्रमांना हजेरी लावेल तिथेही तिला पाहण्यासाठी, तिच्याबरोबर एखादा फोटो काढण्यासाठी येतात. पण रश्मिकाचा एका चाहत्याने तिच्याकडे भलतीच मागणी केली. पण तिनेही ती हसत हसत पूर्ण केली आहे. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

रश्मिकाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रश्मिकाने एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती, तेंव्हा तिला पाहण्यासाठी तिच्या अवतीभोवती चाहत्यांची गर्दी जमली आहे. त्यामधील एक चाहता तिच्या जवळ आला आणि त्याने रश्मिकाला त्याने घातलेल्या टी-शर्टवर हृदयाच्या जागी आॅटोग्राफ देण्याची मागणी केली. त्याची ही अजब मागणी एैकून तिने
सुरुवातीला नकार दिला पण नंतर चाहत्याच्या आनंदासाठी तिने त्याच्या छातीवर स्वतःचं नाव लिहिलं.हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला असून जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अनेकदा सेलिब्रिटींकडे त्यांचे चाहते आगळी वेगळी मागणी करताना दिसतात. रश्मिकालाही असाच अनुभव आला आहे. यादरम्यान रश्मिका मंदानाच्या चेहऱ्यावरील हावभावांनी सर्व काही सांगितले. सध्या हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!