Latest Marathi News
Ganesh J GIF

बापरे! प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानाला हवेतच लागली आग

थरकाप उडवणा-या घटनेचा व्हिडिओ व्हायरल, विमानाच्या हवेतच घिरट्या, परत काय घडले?

दिल्ली दि २५(प्रतिनिधी)- काठमांडूवरून दुबईला तब्बल १५० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एका विमानाच्या इंजिनला विमान हवेतच असतांना आग लागली. विमानाला लागलेली आग विमान हवेत असतांना स्पष्ट दिसत होते. या घटनेमुळे सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला होता. याचा व्हिडिओही सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.

फ्लाय दुबई फ्लाइटने सोमवारी नेपाळच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दुबईसाठी उड्डाण केलं होतं. उड्डाण केल्यानंतर काही वेळातच विमानाच्या एका इंजिनमधून ज्वाळा दिसू लागल्या. या विमानात ५० नेपाळी नागरिकांसह १५० हून अधिक प्रवाशी होते. फ्लाय दुबई विमानाला ५७६ असे आग लागलेल्या विमानाचे नाव होते. ही घटना लक्षात आल्यावर या विमानाचे दुबईत सुरक्षित लॅंडींग करण्यात आले. त्यामुळे जिवीतहानी टळली आहे. तब्बल १५० प्रवाशांना घेऊन हे विमान काठमांडू वरून दुबईला निघाले होते. या विमानात १२० नेपाळी तर ४९ परदेशी नागरिक होते. उड्डाण केल्यानंतर काही वेळातच विमानाच्या एका इंजिनमधून आगीचे लोळ दिसू लागले. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. दरम्यान, हे विमान काठमांडू विमानतळावर उतरणार होते. त्यासाठी विमानतळावर सर्व यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवण्यात आल्या होत्या. विमानातील क्रू मेंबरशी संपर्क सुरू होते. पण या विमानाचे एक इंजिन चांगले असल्याने या विमानाचे सुरक्षित लॅंडींग हे दुबई विमानतळावर करण्यात आले, आणि सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला. पण विमानाला आग का लागली होती हे मात्र समजू शकलेले नाही.

नेपाळ नागरी उड्डाण प्राधिकरणाने दिलेल्या निवेदनानुसार फ्लाय दुबई फ्लाइट ५७६ या विमानाच्या एका इंजिनमध्ये आग लागली होती. या विमानाचे सुरक्षित लॅंडींग हे दुबई विमानतळावर करण्यात आले आहे. विमानातील सर्व प्रवासी हे सुखरूप आहेत. आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकले नाही. मात्र, अधिकारी या घटनेची चौकशी करत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!