Just another WordPress site

व्होडाफोन आयडियाचे सिम वापरत असाल तर सावधान!

आयडिया व्होडाफोनचे सिम वापरणा-या ग्राहकांना जाणवणार 'ही' समस्या

मुंबई दि २८(प्रतिनिधी)- जर तुमच्याकडे आयडिया आणि व्होडाफोनचे सिम असेल तर सावधान कारण नोव्हेंबरपासून व्होडाफोन आयडिया कंपनीच्या ग्राहकांना कनेक्टिव्हिटीबाबत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. सध्या या कंपनीकडे टॉवर कंपन्यांचे १० हजार कोटी रुपये थकित आहे. यापैकी इंडस टॉवरचा हिस्सा ७ हजार कोटी रुपये इतका आहे. त्यामुळे इंडस टॉवरने थकित रक्कम न भरल्यास नोव्हेंबर महिन्यापासून या कपंनीला टॉवर वापरू दिले जाणार नाही, असा इशारा दिला आहे. यामुळे व्होडाफोन आयडिया कंपनीच्या ग्राहकांना रेंजची समस्या निर्माण होणार आहे.

GIF Advt

काही माध्यमांनी या बाबत वृत्त दिले आहे. एका अहवालानुसार, इंडस कंपनीच्या बोर्डची बैठक झाली होती. यामध्ये कंपनीच्या आर्थिक स्थितीवर चर्चा झाली. यात व्होडाफोन आणि आयडिया कंपनीवर ७ हजार कोटींची थकबाकी असल्याचे समोर आले आहे. सर्वात अधिक थकबाकी याच कंपनीची होती. त्यामुळे, इंडस कंपनीने व्होडाफोन आयडिया कंपनीला सर्व थकबाकी जमा करण्याचे म्हटले आहे.जर थकबाकी न भरल्यास टाॅवर भरण्यावर बंदी घातली आहे.जूनच्या तिमाहीत इंडस टॉवरचा नफा ६६ टक्क्यांनी घसरून ४७७ करोड रुपये इतका होता.हा तोटा भरून काढण्यासाठी इंडसने या कंपनीला इशारा दिला आहे.पण आधीच आर्थिक अडचणीत सापडलेल्या वोडाफोन आणि आयडीयाला या इशा-यामुळे ग्राहक गमावण्याची भिती आहे.

भारतीय बाजारपेठेत जिओ आणि एअरटेल नंतर वोडाफोन आयडिया ही देशातील तिसरी मोठी टेलिकॉम कंपनी आहे. मात्र कंपनीची आर्थिक स्थिती सध्या खराब आहे.तसेच या कंपनीवर कर्जाचा बोजा आहे. म्हणूनच इतर कंपन्या ५ जीच्या तयारीत असताना या कंपनीने ५ जी सेवा लाँच केलेली नाही. सध्या कंपनी कर्ज आणि इक्विटीच्या माध्यमातून थकबाकी भरण्याचे प्रयत्न करणार आहे. पण तसे न झाल्यास ब-याच ग्राहकांना नेटवर्कची समस्या जाणवू शकते.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!