
गजानन महाराजांच्या वेशात फिरणाऱ्या व्यक्तीस मारहाण?
मारहाणीचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल, वेगवेगळ्या चर्चांना उधान, नेमके कारण काय?
बुलढाणा दि ४(प्रतिनिधी)- लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असणारे संत श्री गजानन महाराज पुन्हा एकदा प्रकट झाल्याची चर्चा काही दिवसापूर्वी रंगली होती. बुलढाणा जिल्ह्यातील खामगावातील सुटाळपूरा स्थित श्री संत गजानन महाराजांच्या मंदिर परिसरात गजानन महाराज प्रकट झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. पण आता आणखी एक बातमी समोर आली आहे.
सुटाळपुरात गजानन महाराज प्रकट झाल्याची बातमी पसरल्यानंतर अनेकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. या ठिकाणी विविध नागरिकांनी आकर्षित होऊन त्यांना आपल्या निवासस्थानी बोलावून घेतले होते. विशेष म्हणजे या व्यक्तीने दर्शन देताना गजानन महाराजांसारखी कृती केली होती. आता त्या व्यक्तीला मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मारहाण करणारे कोण? आणि मारहाणी मागचे कारण काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. काही लोकांनी मध्यस्थी केली असता त्या नागरिकांनी तेथून काढता पाय घेतला. याचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. जाता या व्हिडिओवरून वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. दरम्यान श्रीसंत गजानन महाराज हे १४५ वर्षापूर्वी संतनगरी शेगाव येथे प्रकट झाले होते. त्याठिकाणी त्यांनी आपले जीवन शेगाव वासियांच्या सहवासात घालविले. दरम्यान त्यांनी मोठा भाविक वर्ग निर्माण केला होता.
श्री संत गजानन महाराजांची व्यक्तिरेखा साकारणारा व्यक्ती हा लातूर जिल्हा बँकेचा खातेधारक आहे .त्याच्या खातेबुकवर मुक्काम युग्गी (सावंगी) पोलीस स्टेशन राणी जिल्हा लातूर असा पत्ता लिहिलेला आहे. ही व्यक्ती ही स्वतःच्या दुचाकीवर संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करत असल्याची माहिती आहे.