गाैतमी पाटीलनंतर ही डान्सर आली नेटक-यांच्या निशान्यावर
इन्स्टाग्रामवरील त्या डान्समुळे डान्सर ट्रोल, बघा का ठरली नेटकऱ्यांच्या टीकेची धनी
पुणे दि ७(प्रतिनिधी)- राज्यात सध्या गाैतमी पाटील चांगलीच चर्चेत आहे. तिच्या अश्लील हावभावामुळे ती टीकेची धनी ठरली होती. पण त्याचबरोबर ती प्रसिद्धही झाली. पण तिच्यानंतर अनेक डान्सर त्याच मार्गाने जाताना दिसत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या लावणीची मात्र आब राखली जात नसल्याचे चित्र आहे.
गाैतमी पाटीलनंतर लावणी डान्सर मयुरी उतेकर चर्चेत आली आहे. एका कार्यक्रमातील डान्स मयुरी उतेकरने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. यात ती डान्सच्या नावाखाली उड्या मारण्याबरोबरच इशारे करताना दिसत आहे. नेटकऱ्यांनी मयुरीला तिच्या डान्सवरून ट्रोल केले आहे.सर्व पोरी आता सपना चौधरी सारख्या स्टेजवर उड्या मारायला लागल्या आहेत असे म्हणत महाराष्ट्राचा बिहार झालाय अशी संतप्त प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत. मयूरी सुरुवातीला गाैतमी बरोबर असायची आता ती स्वतः शो करत असते. पण आता ती देखील आपल्या डान्समुळे चर्चेत आली आहे. पण फेमस होण्यासाठी असे केले जात आहे का अशी देखील शंका व्यक्त केली जात आहे.
मयुरी उतेकर लावणी डान्सर आहे. मयुरीचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. मयुरीचे इन्टाग्रामवर ८० हजारांहून अधिक फॉलोवर्स आहेत. मयुरीचे फोटो आणि व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असतात. पण आता आपल्या डान्समुळेच टीकेची धनी ठरली आहे. नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगला मयुरी काय उत्तर देणार, हे पाहावे लागणार आहे.