Latest Marathi News
Ganesh J GIF

सावधान! माथेफिरू सीरियल किसर करतोय महिलांसोबत अश्लील वर्तन

धक्कादायक व्हिडिओ समोर, सिरियल किसरच्या विरोधात संतापजनक लाट

जमुई दि १५(प्रतिनिधी)- बिहारच्या जमुई येथील एका हॉस्पिटल बाहेर महिला फोनवर बोलत असताना एकाने महिलेसोबत अश्लील कृत्य सुरु केले. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.त्याने केलेल्या अश्लील कृत्याने महिलांमध्ये भीतीचं वातावरण पसरल आहे.

महिला बिहारच्या जमुई सदर रुग्णालयात आरोग्य कर्मचारी म्हणून २०१५ पासून कार्यरत आहे. सदर महिला रुग्णालय परिसरात फोनवर बोलत होती. एवढ्यात रुग्णालयाची भिंत ओलांडून एक युवक धावत तिच्यामागून आला आणि तोंड दाबून अश्लीस कृत्य करून एका क्षणात पळून गेला. हा संतापजनक प्रकार घडल्यानंतर महिलेने जमुई येथील टाउन ठाण्यात घडल्या प्रकाराविरोधात तक्रार दाखल केली आहे. हे अश्लील कृत्य करणाऱ्या नराधमालाला तत्काळ पकडून त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी महिलेने केली आहे. बिहार पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपीच्या शोधासाठी तपास पथके पाठवली आहेत. या तरुणाला लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे. महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या देखील अनेक भयानक घटना समोर आल्या आहेत. अशात आता या सीरियल किसरमुळे महिलांमध्ये पुन्हा एकदा दहशतीचं वातावरण पसरले आहे. दरम्यान सदर व्यक्ती सिरियल किसर आहे. शहरातील महिला आणि मुलींनी खबरदार राहण्याचे आवाहन या माध्यमांतून करण्यात आले आहे.

रुग्णालयात घडलेल्या प्रकारानंतर सोशल मीडियातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. रुग्णालय परिसरात सुरक्षा रक्षक असतानाही इतके घृणास्पद कृत्य घडतेच कसे? असा सवाल विचारला जात आहे.बिहार पोलिसांनीही या प्रकरणात अद्याप कुणाला ताब्यात घेतलेलं नाही, यावरूनही सोशल मीडियातून तीव्र टीका होत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!