Latest Marathi News
Ganesh J GIF

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळी विकास कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न

सुप्रिया सुळे, अनिल देशमुख, विश्वजीत कदम, सुषमा अंधारे अशा दिग्गज मान्यवरांची उपस्थिती, युवा संघर्ष यात्रेला सुरूवात

जामखेड दि १७(प्रतिनिधी)- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ असलेल्या जामखेड तालुक्यातील चौंडी येथे आमदार रोहित पवार यांनी मंजूर करून आणलेल्या कोट्यवधी रुपयांचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोट्यवधींची विकास कामे मंजूर करून आणली होती. परंतु, राज्य शासनाने विविध कामांवर स्थगिती लावल्याने विलंब होत होता.

न्यायालयाने स्थगिती उठवल्यानंतर ती कामे सुरू करण्यासंदर्भात हिरवा कंदील मिळाला. पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ विकासासाठी आमदार रोहित पवार यांनी शासन दरबारी वेळोवेळी आवश्यक तो सर्व पाठपुरावा करून कोट्यवधींची विकास कामे मंजूर करून आणली आहेत. त्यापैकीच जवळपास ७ कोटींच्या कामांचे भव्य भूमिपूजन दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत चौंडी येथे पार पडले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जन्मस्थळी संग्रहालय बांधकाम, जन्मस्थळी असलेल्या नदीकाठी घाटाचे बांधकाम व सुशोभीकरण करणे त्याबरोबरच जन्मस्थळी दोन भव्य मोठ्या स्वागत कमानीचे बांधकाम अशा तब्बल ७ कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन चौंडी येथे पार पडले. त्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री, विश्वजीत कदम व शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांची विशेष उपस्थिती होती. आमदार रोहित पवार यांनी यापूर्वीही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मस्थळ चौंडी येथे जिल्हा परिषद शाळा बांधकाम करण्यासाठी २ कोटी ३ लाख व सीना नदीवर पश्चिम घाटाचे बांधकाम करण्यासाठी ४ कोटी ९९ लाख अशी कोट्यावधींची विकास कामे मंजूर करून आणली आहेत. त्यानंतर आता आणखी ७ कोटींच्या विकासकामांचे भव्य दिव्य असे भूमिपूजन चौंडी येथे पार पडले. सर्व कर्जत-जामखेड मधील नागरिक, सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी व युवा वर्गाने या भूमिपूजन सोहळ्याला व सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार रोहित पवार यांनी केले होते त्याला प्रतिसाद देत मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

यासोबतच चौंडी येथून युवा संघर्ष पदयात्रेच्या पुढच्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. पुणे ते नागपूर अशा पदयात्रेच्या पुढील टप्प्याला आजपासून सुरुवात झाली असून युवा संघर्ष यात्रा नागपूर येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान धडकणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!