Latest Marathi News
Ganesh J GIF

बिअरप्रेमींसाठी सरकारकडून मोठी खुशखबर !

आता २०० रुपयांची बिअर मिळणार फक्त इतक्या रूपयांना, सरकारने नेमका काय निर्णय घेतला?

दिल्ली – बिअर दारु नाही? किंवा बिसर पिल्याने काहीच होत नाही. अशी चर्चा आपण अनेकदा ऎकली आहे. यावर वाद विवाद होत असले तरीही बिअर पिणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पण आता बिअर प्रेमींसाठी महत्वाची माहिती समोर आली आहे.

उन्हाळ्याच्या दिवसांत बिअरची विक्री वाढते. मागणी वाढल्यामुळे अनेकवेळा तुम्हाला तुमचा आवडीचा ब्रँड मिळत नाही किंवा चढ्या दराने बिअर विकत घ्यावी लागते. पण आता मात्र बिअर अतिशय स्वस्त होणार आहे. ब्रिटनचे बिअर ब्रँड्स भारतात कमी पैशांत मिळणार आहेत. भारत आणि ब्रिटन यांच्यातील मुक्त व्यापार करारानंतर ब्रिटनच्या बिअरवरील कर भारताने ७५ % कमी केला आहे. भारतात ब्रिटनच्या ब्रिअरवर याआधी १५० टक्क्यांनी कर लागायचा. आता मुक्त व्यापार कराराअंतर्गत हा कर ७५ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. या कराराअंतर्गत आयात शुल्काबाबत मर्यादित सवलत देण्यात आली आहे. याच निर्णयामुळे भारतात ब्रिटनचा ब्रँड म्हणून ओळखली जाणारी बिअर अगदी स्वस्त मिळणार आहे. विशेष म्हणजे या कराराअंतर्गत फक्त बिअरच नाही तर ब्रिटनकडून येणारे अन्य उत्पादनंही स्वस्त होणार आहेत. २०२४ साली भारतीय बिअर बाजार साधारण ५० हजार कोटी रुपयांचा होता. यात दरवर्षी साधारण ८ ते १० टक्क्यांनी वाढ होत आहे. दक्षिण भारतातील कर्नाटक, तामिळनाडू, केरळ यांसारख्या राज्यांत बीयरची सर्वाधिक विक्री होते. विशेषतः तरुण वर्ग, बदलती जीवनशैली आणि सामाजिक स्वीकृती यामुळे बीयरची मागणी वाढली आहे. दरम्यान बिअर बरोबर भारतातून ब्रिटनमध्ये जाणारे कपडे, चामड्याची उत्पादनं यावरील आयात शुल्कात कपात केली आहे. दोन्ही देशांना मुक्त व्यापाराच्या या करारामुळे फायदा होणार आहे.

भारत आणि ब्रिटन यांच्यात ६ मे रोजी हा करार झाला. या करारात मात्र भारताने वाईनवर कसलीही करकपात केलेली नाही. बिअरवरच आयात करात कपात करण्यात आली आहे. याचा अर्थ असा की भारतात बिअर आता स्वस्त मिळेल. वाईनचे दर मात्र जैसे थे असणार आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!