Latest Marathi News
Ganesh J GIF

मोठी बातमी! अजित पवारांचा ‘या’ पदाचा राजीनामा

राजकीय वर्तुळात राजकीय चर्चांना उधान, हे कारण समोर, नव्या राजकीय समीकरणाची नांदी, नेमके कारण काय?

पुणे दि ११(प्रतिनिधी)- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षात बंडखोरी करत भाजपाशी संधान साधत सत्तेत सहभागी झाले. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. पण आता एक नवीन माहिती समोर आली असून, अजित पवार यांनी आपल्याकडील एक पदाचा राजिनामा दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्हा बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. राज्याच्या सत्तेत सहभागी झाल्याने राष्ट्रवादीचे पक्ष संघटनासाठी वेळ द्यावा लागत आहे. तसेच उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभाराचा व्याप अजितदादांवर वाढला आहे. त्यामुळे बँकेच्या प्रत्येक बैठकींना अजितदादांना उपस्थित राहणे शक्य होत नाही. बँकेच्या तीन बैठकांना उपस्थित राहणे हे संचालकांवर बंधनकारक आहे. बँकेच्या गेल्या बैठकीला ते अनुपस्थित होते. तसेच दादांच्या वेळेनुसार, बँकेच्या बैठकांची वेळ ठरविणे प्रत्येक वेळी शक्य नाही. काही निर्णय़ त्या त्या वेळी घेणे गरजेचे असल्याने दादांच्या वेळेनुसार बैठक घेणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे अजितदादांनी बँकेचा राजीनामा दिला आहे. असे जिल्हा बँकेने जाहीर केले आहे. विशेष म्हणजे अजित पवार गेल्या ३२ वर्षांपासून जिल्हा बँकेचे संचालक होते. अजित पवार 1991 पासून जिल्हा बँकेचे संचालक म्हणून काम पाहत होते. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे म्हणाले की, राज्याचे उपमुख्यमंत्री पद आणि पक्ष संघटनाचा व्याप अजितदादांवर वाढला आहे. त्यामुळे त्यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा राजीनामा दिला आहे. बँकेने त्यांचा राजीनामा मंजूर केला आहे. पण बँकेला आवश्यक मार्गदर्शन आणि मदत करण्यासाठी ते उपलब्ध राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. अजित पवार राज्याच्या राजकारणात सक्रिय झाल्यापासून म्हणजे १९९१मध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक झाले. १९९१ मध्ये बँकेचा व्यवसाय हा ५५८ कोटी रुपयांचा होता. तो आता २० हजार ७१४ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. देशातील आघाडीची बँक म्हणून नावलौकिक मिळविला आहे. तेव्हापासून ते आतापर्यंत सुमारे ३२ वर्ष त्यांनी संचालक म्हणून काम पाहिले. पण आता त्यांनी राजीनामा दिला आहे.

अजित पवार हे याआधी चारवेळा राज्याचे उपमुख्यमंत्री होते. तसेच त्यांनी जलसंपदा विभागाची जबाबदारी सांभाळली आहे. पण तरीही त्यांनी बँकेच्या संचालकपदाचा राजीनामा दिला नव्हता. पण आता ते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्यामुळे त्यांनी आपला राजीनामा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!