मोठी बातमी! माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अटक होणार?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दलचे ते वक्तव्य भोवणार?, शिंदे गटाचे मंत्री फडणवीसांची भेट घेणार, ठाकरे गटाचा इशारा
मुंबई दि ३०(प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी माजी महापाैर दळवी यांना अटक करण्यात आली आहे. पण आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अटक होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांनी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अत्यंत कठोर शब्दात टीका केली आहे. यामुळे उद्धव ठाकरेंवर कारवाई होण्याची शक्यता आहे. यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना त्यांना नालायक म्हटले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्याचे संकेत उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले आहेत. राज्यातला शेतकरी अवकाळीने संकटात सापडला असताना मुख्यमंत्री तेलंगणात प्रचाराला कसे जाऊ शकतात असा सवालही उद्धव ठाकरेंनी केला होता. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याविषयी नालायक या शब्दाचा वापर केला होता. उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर शिंदे गटाच्या मंत्र्यांमध्ये प्रचंड नाराजी दिसून येत आहे. उद्धव यांच्यावर कारवाई केली जाईल, असे कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री असताना उद्धव जर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करू शकतात, तर उद्धव यांच्यावर कारवाई का करू नये, असा सवाल त्यांनी केला आहे. शंभूराजे म्हणाले की, कायदेशीर पथक व्हिडिओची चौकशी करत आहे. असे सांगितले आहे. दरम्यान उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याबाबत शिवसेना (एकनाथ शिंदे) मंत्र्यांची लवकरच बैठक होणार आहे. याबाबत चर्चा करून सर्व मंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. यावेळी कायदेशीर बाबींवर चर्चा होण्याची शक्यता आहे. एकीकडे उद्धव ठाकरेंवर कारवाई करण्याच्या हालचाली शिंदे सरकारनं सुरू केल्या आहेत. तर, दुसरीकडे सरकारमध्ये ताकद असेल तर कारवाई करावी असं आव्हान विरोधी पक्षनेते अंबादास दावनेंनी शिंदे सरकारला दिले आहे.
महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना नारायण राणे यांना अटक झाली होती. तेव्हा स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष म्हणण्या ऐवजी हिरक महोत्सवी वर्ष असे म्हणाले होते. यावरून मी तिथे असतो तर कानाखाली लगावली असती, असा शब्दांत नारायण राणे यांनी ठाकरेंवर टिका केली होती. त्यामुळे नारायण राणे यांना अटक झाली होती.