Latest Marathi News
Ganesh J GIF

मोठी बातमी! मा. उपमुख्यमंत्र्याचा काँग्रेस पक्षात प्रवेश

भाजपाला मोठा धक्का, मोठा राजकीय उलटफेर, बघा काय घडले

बंगरुळ दि १४(प्रतिनिधी)- राजकारणात काहीही होऊ शकतो कारण गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेले भाजप नेते आणि कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची बेंगळुरूमध्ये भेट घेतल्यानंतर ही घोषणा करण्यात आली आहे.

लक्ष्मण सवदी यांनी अथणी मतदारसंघातून तिकीट नाकारल्यानंतर १२ एप्रिल रोजी विधान परिषदेच्या सदस्यपदाचा आणि भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. डीके शिवकुमार म्हणाले की, लक्ष्मण सवदी यांनी काँग्रेसमध्ये येण्यासाठी कोणतीही अट ठेवली नाही. आपला अपमान झाल्याचे त्यांना वाटते. अशा दिग्गज नेत्यांना काँग्रेस पक्षात आणणे हे आपले कर्तव्य आहे. ९-१० पेक्षा जास्त विद्यमान आमदार कॉंग्रेसमध्ये सामील होऊ इच्छितात.लिंगायत समाजाचे प्रभावी नेते आणि २०१८ पर्यंत अथणी विधानसभा मतदारसंघावर वर्चस्व राखलेल्या लक्ष्मण सवदी यांचा राजीनामा भाजपासाठी धक्का आहे. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार यादी जाहीर करताना भाजपने ‘दे धक्का’ धोरण अवलंबल्यानंतर आता भाजपला धक्के बसू लागले आहेत. अथणीतून सवदी यांचे कट्टर प्रतिस्पर्धी आणि भाजपचे आमदार रमेश जारकीहोळी यांचे निकटवर्तीय असलेले कुमठळ्ळी यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. यामुळे नाराज झालेल्या लक्ष्मण सवदी यांनी भाजपमधून बाहेर पडत काँग्रेसचा हात धरला आहे. दरम्यान कुमथल्ली हे जारकीहोळी यांच्यासह काँग्रेसमधून भाजपात पक्षांतर करणाऱ्या आमदारांपैकी होते. ‘मी भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतलाय. भिकेचा कटोरा घेऊन फिरणारा मी नाही. मी एक स्वाभिमानी राजकारणी आहे.’ असे सवदी म्हणाले आहेत.

२०१८ च्या निवडणुकीत काँग्रेसचे तत्कालीन उमेदवार महेश कुमथल्ली यांच्याकडून लक्ष्मण सवदी यांचा पराभव झाला होता. भाजपनं कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी १८९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे त्यांच्या पारंपारिक शिग्गाव मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!