
ही अभिनेत्री नाशिक मधून लढणार आमदार, खासदारकीची निवडणूक
मनसेकडून उतरणार नाशिकच्या राजकारणात, राजकारणाबद्दल अभिनेत्री म्हणाली...
मुंबई दि १४(प्रतिनिधी)- मराठी मालिका, चित्रपटांमध्ये उत्तमोत्तम काम करत अभिनेत्री सायली संजीव लवकरच राजकारणात प्रवेश करणार आहेत. सायली निवडणुकीत उभे राहण्याची चिन्ह आहेत, तसे संकेत अभिनेत्रीने दिले आहेत.
सायली संजीवची काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. याबद्दल तिला एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत बोलताना राजकीय प्रश्न विचारला असता ती म्हणाली की, ‘आता मी एका पक्षामध्ये आहे. त्या पक्षाच्या मी पदावर आहे. तर अर्थातच त्या पक्षाची बाजू मी मांडणार. मी ज्या पक्षात आहे त्या पक्षाची बाजू मांडताना जर माझ्यावर टीका होत असेल तर ते मी स्वीकारते. ही टीका स्वीकारणं गरजेचंच आहे. संबंधित पक्षाची विचारधारा पुढे नेण्यासाठी तुम्हाला विचार मांडावे लागतात. त्यामुळे टीका होत असली तरी त्याचा मला फरक पडत नाही. जे महाराष्ट्र, देशासाठी चांगले आहेत त्यांना चांगलं म्हणण्याचीही आपल्यामध्ये वृत्ती असावी. मीही ते फॉलो करते. पण त्यावरही टीका होते त्यासाठी धन्यवाद. कारण टीका करणारे एवढा वेळ माझ्यासाठी देत आहेत, माझ्याबाबत बोलत आहेत याचा मला आनंद आहे” असे टिपिकल राजकीय उत्तर सायलीने दिले आहे. भविष्यात नाशिकचा नगरसेवक, आमदार, खासदार या पदी आम्हाला तू दिसणार का?” असा प्रश्न विचारला असता सायली म्हणाली की, माहीत नाही. असेलही. कारण नक्कीच मला काम करायला आवडेल.’ त्यामुळे मनसेकडुन सायली लवकरच निवडणूकीत उतरणार असल्याचे संकेत दिले आहेत. पण सोशल मिडीयावर ती मनसेकडून नाशिकची लोकसभेची निवडणुक लढणार असल्याची चर्चा आहे.
सायलीच्या कामाची कायमच चर्चा होत असते पण तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही अनेक चर्चा आजवर झालेल्या आहेत. तिने आजवर अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘हर हर महादेव’, ‘गोष्ट एका पैठणीची’ ‘सातारचा सलमान’ या चित्रपटात सायलीने भूमिका केली आहे.