Latest Marathi News
Ganesh J GIF

मोठी बातमी! राणे यांची राजकारणातून अचानक निवृत्ती

सोशल मिडीयावर पोस्ट करत निवृत्तीची घोषणा, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाला धक्का, उलटसुलट चर्चांना उधान

मुंबई दि २४(प्रतिनिधी)- लोकसभा निवडणूका जवळ आल्याने सर्व इच्छुक निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. पण त्यातच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी सक्रीय राजकारणामधून निवृत्तीची घोषणा केली आहे. आपल्या ‘एक्स’ अकाऊंटवरुन निलेश राणेंनी ही घोषणा केली आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

भारतीय जनता पार्टीचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी राजकारणातून कायमचे बाजूला होण्याची घोषणा केली आहे. आपली भुमिका त्यांनी x वर मांडली आहे. आपली भूमिका मांडताना ते म्हणाले आहेत की, “मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही, मागच्या १९ ते २० वर्षांमध्ये आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं, कारण नसताना माझ्यासोबत राहिलात त्याबद्दल मी आपला खूप आभारी आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये खूप प्रेम मिळालं. भाजपासारख्या एका उत्तम संघटनेत काम करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी खूप नशीबवान आहे,” अशी भावना निलेश राणे यांनी व्यक्त केली आहे. “निवडणूक लढवणं वगैरे यात मला आता रस राहिला नाही, टीका करणारे टीका करतील पण जिथे मनाला पटत नाही तिथे वेळ स्वतःचा आणि इतरांचा वाया घालवणे मला पटत नाही. कळत नकळत मी काही लोकांना दुखावलं असेल त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो.” असेही राणे म्हणाले आहेत. विशेष म्हणजे त्यांचे वडील नारायण राणे हे केंद्रीय मंत्री आणि भाऊ आमदार असूनही निलेश राणे यांनी ही घोषणा केल्यामुळे उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. निलेश राणे हे १५ व्या लोकसभेमध्ये रत्नागिरी-सिंधुदूर्ग मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर निवडून गेले होते. पण नंतर दोन्ही लोकसभा निवडणूकीमध्ये त्यांना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांच्याकडून पराभव स्वीकारला लागला होता. त्यामुळे दहा वर्ष ते राजकियदृष्या सक्रिय नव्हते.

निलेश राणे हे त्यांच्या आक्रमक स्वभावासाठी ओळखले जातात. सोशल मीडियावर बेधडक मतप्रदर्शन करण्याच्या सवयीमुळे त्यांना अनेकदा टीकचे लक्ष्यही व्हावे लागले होते. पण आता ते खरच राजकारणातून निवृत्त होणार की ते शोकसभेसाठी आपल्या दावेदारीसाठी दबाव टाकत आहेत का? अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!