मोठी बातमी! उपमुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांचा राजीनामा
राजकारणात खळबळ, न्यायालयाच्या दणक्यानंतर दिला राजीनामा
दिल्ली दि २८(प्रतिनिधी) – दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी अखेर आपलस राजीनामा दिला आहे. मनीष सिसोदिया सध्या सीबीआय कोठडीत आहेत. सिसोदिया यांच्यासह सरकारमधील सत्येंद्र जैन यांनीही आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यांमुळे दिल्लीच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
दिल्लीचे उपमुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे नेते मनीष सिसोदिया यांना मद्य घोटाळाप्रकरणी सीबीआयने अटक केली आहे. ते ४ मार्चपर्यंत सीबीआय कोठडीत आहेत. सिसोदिया हे दिल्लीचे उपमुख्यमंत्री, व शिक्षणमंत्री देखील होते. आप सरकारमधील आरोग्यमंत्री असलेल्या सत्येंद्र जैन यांनीही आपला राजीनामा दिला आहे. जैन यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा आरोप ठेवण्यात आला आहे. दिल्लीतील नवीन मद्य धोरणातील भ्रष्टाचार प्रकरणी जुलै २०२२ मध्ये दिल्लीचे नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांनी मनीष सिसोदिया यांच्या विरोधात सीबीआय चौकशीची शिफारस केली होती. सिसोदिया यांनी नियमांकडे दुर्लक्ष करून भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. यानंतर ईडी आणि सीबीआयने तपास सुरू केला होता.
दिल्ली सरकारमधील दोन मंत्र्यांना अटक झाल्यानंतरही ते राजीनामा का देत नाही? अशी चर्चा सुरु होती. अखेर या दोन्ही बड्या मंत्र्यांचे राजीनामे दिल्यानंतर केजरीवाल यांनी ते राजीनामे मंजूर केले आहेत.