Latest Marathi News

चिंचवडमध्ये जगतापच कसब्यात काँग्रेसचे धंगेकर जिंकणार

कसबा व चिंचवड पोटनिवडणूकीचा एक्झिट पोल समोर, भाजपाला धक्का

पुणे दि २८(प्रतिनिधी)- कसबा आणि चिंचवड मध्ये पार पडलेल्या पोट निवडणूकीचा निकाल २ मार्चला जाहीर होणार आहे. पण त्याआधीच याचा दोन जागांचा एक्झिट पोल व्हायरल होत आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजपात चुरशीच्या लढतीत धक्कादायक अंदाज या पोलने वर्तवला आहे.

समोर आलेल्या एक्झिट पोलनुसार कसब्यामध्ये भाजपला धक्का बसणार असून काँग्रेसचे रविंद्र धंगेकर विजयी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तर चिंचवडची जागा मात्र भाजप राखणार असून अश्विनी जगताप या विजयी होतील असं म्हटले आहे. स्ट्रेलिमा या संस्थेना हा पोल जाहीर केला असुन या संस्थेने कोणाला किती मिळतील याचा देखील अंदाज वर्तवला आहे. कसब्यासाठी वर्तवलेल्या अंदाजात भाजपला याठिकाणी धक्का बसणार आहे. भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव होणार असून काँग्रेसचे रविंद्र धंगेकर १५ हजार मतांनी विजयी होतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या ठिकाणी रविंद्र धंगेकर यांना ७४,४२८. तर हेमंत रासने यांना ५९,३५१ मते मिळण्याची शक्यता आहे. चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत “रिंगसाईड रिसर्च “चा एक्झिट पोल समोर आला आहे . या पोलनुसार ही जागा भाजपच जिंकेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या ठिकाणी आश्विनी जगताप यांना १,२५,३५४ तर राष्ट्रवादीचे नाना काटे यांना ९३,००३ आणि अपक्ष राहुल कलाटे यांना ६०, १७३ मते मिळण्याची शक्यता आहे ३२ हजार मतांनी जगताप आपली जागा राखण्याची शक्यता आहे.

पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड या पुण्यातल्या दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये रविवारी मतदान पार पडलं. तर मतमोजणी गुरूवारी म्हणजेच २ मार्चला होणार आहे, पण मतमोजणीच्या आधीच विजयाचे अंदाज समोर आल्यामुळे उत्सुकता वाढली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!