Just another WordPress site

‘फडणवीस शिंदे महाडाकू तर तुम्ही गद्दारांचे बाप आहात’

८० वर्षाच्या शेतकरी बच्चू कडूंवर भारी, कडूंची शाळा घेतल्याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल

धाराशिव दि २८(प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या ४० आणि अपक्ष १० आमदारांनी बंड केल्यानंतर त्यांना गद्दार म्हणून हिणवण्यात आले. तसेच ५० खोके हा शब्दही लोकप्रिय झाला होता. पण धाराशिवमध्ये आमदार बच्चू कडू यांना गाठत एका ८० वर्षाच्या शिवसैनिकाने चांगलीच हजेरी घेतली याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल झाला आहे.

एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व अमान्य करत भाजपच्या साथीने सत्ता स्थापन केली. तेव्हापासून शिंदे यांच्यासह गेलेल्या आमदारांविषयी काहींच्या मनात रोष आहे.लग्नसमारंभात आपल्याला “५० खोके एकदम ओक्के…” म्हणून डिवचतात अशी खंत बच्चू कडू यांनी व्यक्त केली होती. पण आज त्याच बच्चू कडू यांना लोकांच्या नाराजीचा सामना करावा लागला. एका कराव्या सुनसवणीसाठी कडू धाराशिवमध्ये आले होते. ८० वर्षाच्या आजोबांनी बच्चू कडू यांना कोर्टातून बाहेर येताना अडवून आपण जनतेसोबत गद्दारी केली. आपण गद्दार आहात असे सुनावत कडूंची शाळा घेतली. ते म्हणाले “राज्यात जे काही घडलं ते बरोबर नव्हतं. तुमच्याकडून वेगळ्या अपेक्षा होत्या. पण तुम्हीही त्या फडणवीस आणि शिंदे या डाकू बरोबर गेलात. घटनेची पायमल्ली केलीत. यासाठी आम्ही तुम्हाला निवडून दिलं होतं का? अशा शब्दात उद्धव ठाकरे यांची साथ सोडणाऱ्या माजी मंत्री बच्चू कडू यांची अर्जुन घोगरे या ८० वर्षाच्या शेतक-याने शाळा घेतली. यावेळी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी घोगरे यांना समजवण्याचा प्रयत्न केला, पण ते काही ऐकण्याच्या मनस्थित नव्हते.

GIF Advt

 

कोर्टाच्या आवारातच या व्यक्तीने बच्चू कडू यांच्या गाडीच्या समोर जात गाडी अडवून धरली होती. शेतकऱ्याच्या तीव्र भावना लक्षात घेऊन शेवटी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला अन् मग बच्चू कडू यांची गाडी भरधाव वेगात निघून गेली. पण या प्रकाराची चर्चा रंगली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!