मोठी बातमी!उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्याचे नवे पालकमंत्री
पालकमंत्रिपदांचा तिढा सुटला, अजित पवार गटाला या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद, नवीन यादी जाहीर
मुंबई दि ४(प्रतिनिधी)- मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर असल्याने त्यांच्या नाराजीच्या चर्चेने पुन्हा जोर धरला आहे. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अचानक दिल्लीला रवाना झाल्यानंतर चर्चेंना पुन्हा उधाण आले आहे. परंतु या नाराजीमागचे कारण समोर आले आहे. त्यामुळे लवकरच अजित पवार यांची मनधरणी झाली आहे. पण पवार शिंदे यांच्यातील सुप्त वाद भाजपा श्रेष्ठी सोडवणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
अजित पवार बैठकीला न आल्याचे कारण सांगताना त्यांची तब्येत बरी नसल्याचे सांगण्यात आले होते. पण पालकमंत्री पदावरून अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. पुण्यासोबत नाशिक, कोल्हापूर, बीड, रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळावे, यासाठी अजित पवार आग्रही आहेत. तर दुसरीकडे शिंदे गटाकडून सातारा व रायगडचे पालकमंत्रीपद सोडले जामार नाही, असे सांगण्यात येत होते. त्यामुळे याचा निर्णय थेट दिल्लीतून होणार होता. दुसरीकडे सोबतच अर्थमंत्री म्हणून अजित पवारांना हवी तशी मोकळीक मिळत नसल्याचीही चर्चा सुरू आहे.कारण त्यांची कोणतीही फाईल अगोदर फडणवीस आणि नंतर एकनाथ शिंदे यांच्याकडे जाणार आहे. त्यामुळे अजित पवारांची कोंडी होत आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री शिंदे यांनाही मंत्रिमंडळाचा विस्तार हवा आहे. पण भाजपच्या श्रेष्ठींकडून विस्ताराला मान्यता मिळत नसल्याने अडचणी झाली आहे. पण आज दिल्लीत पालकमंत्री वाटपाला मान्यता मिळाली आहे. त्यानुसार नवीन यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे.
पुण्याच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटला आहे. भाजपा आणि अजितदादा गटात पालकमंत्रीपदाचा वाद आता थांबला आहे. पुण्याच्या पालकमंत्रीदावरून चंद्रकांत पाटील यांची उचलबांगडी करण्यात आली असून अजित पवार यांच्याकडे पुण्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे. राज्यातील ११ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. पालकमंत्री जाहीर झाल्याने आता मंत्रिमंडळ विस्तार आणखी लांबणार असल्याचे नक्की झाले आहे.
नवे पालकमंत्री
पुणे- अजित पवार
अकोला- राधाकृष्ण विखे- पाटील
सोलापूर- चंद्रकांत दादा पाटील
अमरावती- चंद्रकांत दादा पाटील
भंडारा- विजयकुमार गावित
बुलढाणा- दिलीप वळसे-पाटील
कोल्हापूर- हसन मुश्रीफ
गोंदिया- धर्मरावबाबा आत्राम
बीड- धनंजय मुंडे
परभणी- संजय बनसोडे
नंदूरबार- अनिल भा. पाटील
वर्धा – सुधीर मुनगंटीवार