मुंबई दि २६(प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी न्यायालयाबरोबरच निवडणूक आयोगाकडे देखील सुरु आहे. सर्वोच्च न्यायालयाची पुढील सुनावणी २९ तारखेला होण्याची शक्यता आहे. तर निवडणूक आयोगाकडेही सुनावणी सुरु होती. पण आता आयोगाने शिवसेनेला दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिंदे गटाची चिंता वाढली आहे.
शिवसेनेने कागदपत्रं सादर करण्यासाठी ४ आठवड्यांचा वेळ मागितला होता. ती विनंती आयोगाने मान्य केली आहे. शिवसेनेनं २३ ऑगस्ट रोजी निवडणूक आयोगाकडे मुदतवाढ मागितली होती. निवडणूक आयोगानं सेनेची ही विनंती मान्य केली आहे. शिवसेनेनं यापूर्वी देखील केंद्रीय निवडणूक आयोगाकडे ४ आठवड्यांची मुदतवाढ मागितली होती. त्यावेळी निवडणूक आयोगाकडून उद्धव ठाकरेंच्या गटाला २ आठवड्यांची वेळ दिली होती. ही मुदत २२ ऑगस्टला संपली होती. शिवसेनेला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे कागदपत्रं सादर करण्यासाठी ४ आठवड्यांचा वेळ देण्यात आला आहे. एकीकडे न्यायालय सतत नवनवीन तारखा देत असल्यामुळे निकाल लांबला आहे.सुनावणी आणि घटनापीठाची तारीख लांबणीवर पडली आहे. तर दुसरीकडे केंद्रीय निवडणूक आयोगानं विनंती मान्य केल्यानं २३ सप्टेंबर पर्यंतची नवी मुदत शिवसेनेला मुदत मिळाली आहे.
न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला कोणताही निर्णय घेऊ नये, असे आदेश देण्यात आले आहेत. पण प्रकिया राबण्यास अनुमती दिली आहे. त्यामुळे निवडणूक आयोग सध्या तरी न्यायालयाच्या निकालावर लक्ष ठेऊन आहे.त्यामुळे शिवसेनेला मुदतवाढ देण्यात आली आहे. ही मुदतवाढ ठाकरे गटासाठी चिंता वाढवणारी आहे.